World Cancer Day
World Cancer Day esakal
नागपूर

World Cancer Day : युवकांमध्ये वाढत्या कर्करोगास व्यसन, चुकीची जीवनशैली कारणीभूत

सकाळ वृत्तसेवा

Nagpur : तरुणांमध्ये लक्षणीयरीत्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी ५४ टक्के रुग्ण २० ते ३९ वयोगटातील आहेत. यावरून तरुणाईभोवती कर्करोगाचा विळखा किती घट्ट होत आहे, हे लक्षात येते. यातील अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या ५४ टक्के रुग्णांमध्ये २०-२४ वयोगटातील रुग्णांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत तर १५-१९ वयोगटातील रुग्णांची संख्या २० टक्क्यांपर्यंत नोंदविण्यात आली आहे.

दशकभरात जीवन अधिक गतिमान झाले. ताणतणावयुक्त जीवनासह अतिमद्यपान, असंतुलित व अपुरी झोप, धूम्रपानाचे वाढते प्रमाण, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ अधिक प्रमाणात सेवन करणे, लठ्ठपणा, असंतुलित व तणावयुक्त जीवनशैली, निसर्गातील प्रदूषण आदी बाबी कमी वयात कर्करोगासाठी कारणीभूत ठरताहेत.

कर्करोग विमा करवून घ्या

हल्ली कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. युवा-प्रौढावस्थेत कर्करोग झाला तर आर्थिक बाजू कोलमडते. शिवाय दीर्घ उपचारांसाठी रुग्णाचा वेळदेखील खर्च होतो. त्या काळात आर्थिक समस्या उद्भवू नये म्हणून कर्करोग विमा काढावा. त्यामुळे कर्करोग उपचारांदरम्यान आर्थिक बाजू सांभाळता येते.

प्राथमिक टप्प्यात उपचार गरजेचे

कर्करोगाच्या पहिल्या टप्पात रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोहचला तर ९० टक्के रुग्ण पाच वर्षांहून अधिक काळ जगू शकतात. दुसऱ्या टप्यात विकार असेल तर ७० टक्के रुग्णांचे आयुर्मान पाच वर्षांहून अधिक असते. मात्र, चौथ्या टप्प्यात ५ वर्षे जगणाऱ्या रुग्णांची संख्या ३० ते ४० टक्क्यांहून कमी असते. त्यामुळे प्राथमिक टप्प्यातच उपचारांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याजे तज्ज्ञ सांगतात.

कर्करोगजन्य पदार्थ टाळा

तंबाखू-धूम्रपान-मद्यपान यांच्यासह कर्करोग होण्याची कारणे अनेक आहेत. तरीही लोक मोठ्या प्रमाणात या पदार्थांचे सेवन करतात. युवावस्थेत कर्करोग झाला तर संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो. समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येतो. खरेतर परिवाराच्या आणि समाजाच्या हितासाठी कर्करोगजन्य पदार्थांचे सेवन टाळावे.

डॉ. नितीन बोमनवार, कर्करोग शल्यचिकित्सक

युवावस्थेतील कर्करोग

-एकूण रुग्णांपैकी २०-३९ वयातील रुग्णांचे प्रमाण ५४ टक्के

-त्या ५४ टक्क्यांपैकी मुखकर्करोगाचे प्रमाण २७ टक्के

-स्तन कर्करोगाचे प्रमाण ११ टक्के

-पोटाच्या कर्करोगाचे रुग्ण ८ टक्के

-सीएनएस कर्करोग १० टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Jain Video : राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा; म्हणाले...

Afghanistan Floods : अफगाणिस्तानमध्ये महापूर, ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; अनेक घरं गेली वाहून

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

SCROLL FOR NEXT