Nagpur Corona Update new 5338 corona patients today  
नागपूर

नागपुरात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक संसर्ग! एकाच दिवशी तब्बल ५ हजार ३३८ पॉझिटिव्ह; तर ६६ जणांचा मृत्यू 

केवल जीवनतारे

नागपूर ः आरोग्य दिनाच्या पर्वावर नागपूर शहर व ग्रामीण भागात बुधवारी (ता.७) कोरोनाचा रुद्रावतार पाहायला मिळाला आहे. मागील वर्षभरातील कोरोनाबाधितांच्या दर दिवसाला आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा तसेच मृत्यूचा रेकॉर्ड मोडित एक नवीन विक्रम नोंदवला आहे. एकाच दिवसात ५ हजार ३३८ कोरोनाबाधित आढळले असून ६६ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.

कोरोनाची बाधा झालेल्यांवर एक नवेच संकट उभे ठाकले आहे. खासगी रुग्णालयांसह मेयो, मेडिकलमध्येही खाटा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना भटकंती करावी लागत आहे. उच्चांकी कोरोनाबाधित असलेल्या ५ हजार ३३८ रुग्णांत शहरातील शहरातील ३ हजार २८३ तर ग्रामीण भागात २ हजार ४८ रुग्णांचा समावेश आहे. तर जिल्ह्याबाहेरील ७ रुग्ण नागपुरात बाधित असल्याची नोंद झाली. तर ६६ मृत्यूंमध्ये शहरातील ३४ जणांचा मृत्यू झाला. तर ग्रामीण २५ जण दगावले. 

जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत ५ हजार ५०४ जणांचे कोरोनाचे मृत्यू नागपूर जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत. मागील वर्षभरापासून आतापर्यंत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ९६ हजार ७३३ झाली आहे. तर ग्रामीण ५६ हजार ४१८ आणि जिल्ह्याबाहेरील १ हजार ७० अशी एकूण २ लाख ५४ हजार २२१ कोरोनाबाधितांची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. 

दिवसभरात शहरात २ हजार ८९० आणि ग्रामीण ९७८ अशा एकूण ३ हजार ८६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरातील कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ६४ हजार ९७२ तर ग्रामीण ४० हजार ८१२ अशा एकूण २ लाख ५ हजार ७८४ जणांनी कोरोनाला हरवले आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तांचे प्रमाण ८०.९५ टक्के आहे. कोरोनाबाधितांच्या विक्रमाप्रमाणेच चाचण्यांचाही विक्रम जिल्ह्यात नोंदवला आहे. शहरात दिवसभरात १० हजार ४४८, तर ग्रामीण भागात ८ हजार ७४३ अशा एकूण १९ हजार १९१ संशयीत व्यक्तींच्या चाचण्या झाल्या आहेत. बुधवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधितांचाच्या अहवालाचे प्रमाण ३६.६२ टक्के आहे.

गंभीर संवर्गात ५८९७ रुग्ण

शहरात २९ हजार ४५, ग्रामीण १३ हजार ८८८ असे एकूण जिल्ह्यात ४२ हजार ९३३ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यापैकी ३७ हजार ३६ रुग्ण गृह विलगिकरणात उपचार घेत आहेत. तर गंभीर संवर्गातील ५ हजार ८९७ कोरोनाबाधितांवार मेयो, मेडिकल, एम्ससहित विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बाधितांची संख्या

१ एप्रिल - ३६३०
२ एप्रिल - ४१०८
४ एप्रिल - ४११०
७ एप्रिल - ५३३८

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT