corona
corona sakal
नागपूर

नागपूर : कोरोना संसर्ग ‘गर्दी’ पुढे पडला फिका!

सकाळ वृत्तसेवा

मंगरुळपीर : येथील तहसील कार्यालयाच्या आवारतच असलेल्या मुद्रांक कार्यालयात मुद्रांक खरेदीसाठी मुद्रांक विक्रेत्यांकडे स्टॅम्प घेण्यासाठी कार्यालयात तहसील आवारातील मुद्रांक विक्रेत्यांकडे गर्दी नेहमीच असते. परंतु, ना विक्रेत्यांना मास्क ना, नागरिकांना मास्क नसल्याने कोरोनाचे नियमांचा फज्जा उडत आहे. तरी, या ठिकाणी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून बेजबाबदार गर्दीमुळे कोरोनासारख्या आजाराला परत आमंत्रण दिले जात आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

नागरिकांना आपल्या विविध कामासाठी मुद्रांकाची आवश्यकता असते. खरेदी- विक्री यासह बँकेचे कर्ज आणि इतरही कामासाठी मुद्रांकची मागणी केली जात आहे. मात्र, सकाळी दहा वाजतापासून ग्रामीण भागातून शेतकरी व इतरही नागरिक मुद्रांक मिळावा म्हणून तहसील कार्यालयाच्या आवारातील मुद्रांक विक्रेत्यांकडे येतात. त्यामुळे मुंद्राक विक्रेत्यांसमोर मोठी गर्दी होत आहे. स्टॅम्प घेण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने मुद्रांक विक्रेते देखील वैतागले आहेत.

सध्या बॅँक कर्ज, वीज कनेक्शन, घरकुल, संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे, प्लॉट खरेदी-विक्री, शेती, घर, वाहन यासाठी स्टॅम्पची मोठी मागणी आहे. त्याकरिता मुद्रांक विक्रेत्यांकडे नागरिक गर्दी करीत असतात. परंतु, तेथे कोणत्याही प्रकारच्या कोरोना नियमांचे पालन होत नसून ५०० वर्ग मीटरच्या खोलीमध्ये शंभरावर नागरिकांची गर्दी होत असते. त्यामध्ये ना नागरिकांना मास्क असते ना विक्रेत्यांना. या सर्व गोंधळाला पाहून कोरोना पूर्णतः गेला काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

एका शाळेत हलविले होते विक्रेते

या आधी ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी ‘सकाळ’ च्या वृताची गंभीर दखल घेऊन मुद्रांक विक्रेत्यांना शहरातील एका शाळेत हलविले होते. आता संबंधित अधिकारी याबाबींची दखल घेणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विना मास्क जनता सुसाट

कोरोनाचा संसर्ग अजूनही पूर्णपणे थांबला नाही. कोरोनाचे नियमही शासनाने शिथिल केले नाहीत, सुरक्षित अंतर व तोंडावर मास्क लावणे आवश्यक असताना मास्क कोणाच्याही तोंडावर दिसत नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विनामास्क धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT