Nagpur Crime  Esakal
नागपूर

Nagpur Crime: २१ जणांनी घरात घुसून केली होती इसमाची हत्या, मुख्य आरोपीला सापळा रचून अटक

खुनाच्या आरोपाखाली सहा वर्षापासून फरार आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी नविन कामठी पोलिस ठाण्याच्या रामगड परिसरातून त्याला सापळा लावून अटक केली.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime Killer Arrested: खुनाच्या आरोपाखाली सहा वर्षापासून फरार आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी नविन कामठी पोलिस ठाण्याच्या रामगड परिसरातून त्याला सापळा लावून अटक केली. जहुर खान वल्द रहीम खान (वय ६०, रा. ओडिशा) असे आरोपीचे नाव आहे.

१९ मार्च २०१८ साली रात्री बारा वाजताच्या सुमारास शेख अलताफ शेख जमील (वय ३८, रा. नवीन कामठी) हे परिवारासह घरी असताना जहुर खान आणि त्याच्या २१ साथीदारांनी जुन्या भांडणातून कुटुंबावर शस्त्रासह हल्ला करीत, शेख ईकबाल वल्द शेख जमील (वय ३७) याचा खून केला होता. (Latest Marathi News)

याशिवाय समीर शेख, जहीना बी व शेख अलताफ यांना जखमी केले होते. यातील २० आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, जहुरसह आणखी एक आरोपी फरार होता. दरम्यान जहुर परिसरात फिरत असल्याची माहिती युनिट पाचचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांना मिळताच, त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT