Nagpur Crime sakal
नागपूर

Nagpur Crime : मासोळी शिजविण्याचा वादात तिघांनी डोक्यात घातला दगड ;खुनामुळे सोनेगावात खळबळ दोघांना अटक

बांधकामाचा ठिकाणी राहणाऱ्या कामगारांमध्ये मासोळी शिजविण्याच्या कारणाहून झालेल्या भांडणातून तिघांनी एका कामगाराच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.२०) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास सोनेगाव हद्दीत मिहान सिटी जवळील सूर्या रेसिडन्सीजवळ उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बांधकामाचा ठिकाणी राहणाऱ्या कामगारांमध्ये मासोळी शिजविण्याच्या कारणाहून झालेल्या भांडणातून तिघांनी एका कामगाराच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.२०) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास सोनेगाव हद्दीत मिहान सिटी जवळील सूर्या रेसिडन्सीजवळ उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक जण फरार आहे.

लम्बू ऊर्फ शिवम (वय ३०) असे मृताचे नाव असून जितेंद्र बाळाराम रावटे (वय ३५, रा. विटाल, राजनांदगाव, छत्तीसगड), अखिलेश धोडुलाल सहारे (वय २८, रा. अट्टाकोड, सिवनी, बालाघाट, मध्यप्रदेश), दीपक नावाचा ईसम (सर्व रा. हल्ली मुक्काम चौरसिया लेबर झोपडपट्टी, डी.पी.एस. शाळेमागे, मिहान) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहान सिटी जवळ सूर्या रेसिडन्सी नावाच्या गृहनिर्माण योजनेचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी ठेकेदाराने रेल्वे स्टेशन येथून काही मजूर कामासाठी आणले. ते काही दिवसांपासून तिथेच राहतात. गुरुवारी रात्री काम केल्यावर त्यांना परिसरातील बाजारातून चिकन आणि मासोळी आणली.

मात्र, ते शिजविण्यावरून लम्बू आणि तिघांमध्ये वाद झाला. त्यावरून तिघांनीही त्याच्या डोक्यावर दगडाने वार केले आणि पळून गेले. लम्बू रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यामुळे आरडाओरड झाल्याने ठेकेदार बळीराम शिवराम मोगले (वय ४८, रा. चौरसिया लेबर झोपडपट्टी) तिथे आले. त्यांनी लम्बूला एम्समध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना सूचना देताच, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासणी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक आंचल कपूर यांनी तपास करीत, दोघांना अटक केली. तिसऱ्याचा शोध सुरू आहे.

लम्बू नेमका कुठला?

तिघांनी दगडाने वार करीत, खून केलेल्या लम्बू ऊर्फ शिवम हा नेमका कुठला आहे याबाबत अद्यापही सुगावा लागलेला नाही. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनजवळ उभे असलेल्या कामगारांमध्ये त्याचा समावेश होता. मारेकरी असलेल्या तिघांपैकी त्याला कुणीही ओळखत नव्हते. तपासात त्याच्याकडे कुठलेही दस्तऐवज नसल्याने तो नेमका कुठला आहे, याबाबत पोलिस शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT