Nagpur Crime sakal
नागपूर

Nagpur Crime : क्षुल्लक कारणावरून चाकूने वार करीत केला दहावीतील विद्यार्थ्याचा खून; नागपूरातील घटना, दोन अल्पवयीनांवर गुन्हा दाखल

क्षुल्लक भांडणातून दोघांनी दहावीतील विद्यार्थ्यावर चाकूने वार करीत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : क्षुल्लक भांडणातून दोघांनी दहावीतील विद्यार्थ्यावर चाकूने वार करीत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली.

पीयुष चक्रधर अतकरी (वय १७, रा. पारडी) असे मृताचे नाव आहे. तो गुमथळा येथे मामाकडे शिकत असून उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आई-वडिलांकडे आला होता. पीयुष त्याच्या दोन मित्रांसह पारडी परिसरात असलेल्या शिकवणी वर्गाला मागच्या रस्त्याने जात असताना, गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्याला एका मुलगा सातत्याने शिवीगाळ करीत होता.

शनिवारीही (ता.८) त्याने शिवीगाळ केल्याने पीयुषने त्याला रविवारी पारडीतील लाल शाळेच्या मागच्या मैदानात भेटण्यासाठी बोलाविले. रविवारी (ता.९) पियुष आणि त्याचे दोन मित्र रात्री साडेआठच्या सुमारास पारडीतील बस स्टॅण्ड जवळील ब्रदर्स नावाच्या सलून मध्ये बसले होते. पीयुषला शिवीगाळ करणाऱ्या युवकाचा इन्स्टाग्रामवरून कॉल आला.

बोलायचे असल्याने शिकवणी वर्गाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेवर भेटण्यास बोलाविले. पीयुष व त्याचे चार मित्र तिथे गेले. तिथे आरोपी मुलासह त्याचा मित्रासोबत उभा होता. पीयुषने त्याला भांडण करायचे नसून बोलून वाद संपविण्याची मागणी केली. मात्र, आरोपीने शिवीगाळ करून त्याला हातबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली.

त्यामुळे पीयुषने त्याला पटकणी देत, खाली पाडले आणि मारू लागला. इतक्यातच त्याच्यामित्राने खिशातून चाकू काढून पीयुषच्या पोटावर, छातीवर आणि हातावर वार करून दोघांनीही पळ काढला. मित्रांनी पियुषला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी (ता.११) सकाळी उपचारादरम्यान पीयुषचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करीत, दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT