नागपूर

Crime: नात्याला काळीमा फासणारी घटना! चुलत्याने स्वतःच्या पुतणीचा केला विनयभंग

पुतणीचा विनयभंग; काकावर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

बाळापूर: तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. चुलत्याने स्वतःच्या पुतणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा बाळापूर पोलिसात दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बाळापूर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका १९ वर्षीय युवतीचा तिच्या ३५ वर्षीय चुलत्यानेच विनयभंग करून स्वत: जीव देऊन चिठ्ठीत तिचे नाव लिहून ठेवण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.२८) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पीडित युवती बुधवारी (ता.२८) घरी एकटीच होती. त्यामुळे ती घरी एकटीच असल्याची संधी साधत तिच्या चुलत्याने घरात प्रवेश केला.

त्यानंतर स्वतःच्या पुतणीशी अश्लील संभाषण करत वाईट उद्देशाने युवतीचा विनयभंग केला. त्यानंतर या घटनेची वाच्यता कुठे केल्यास स्वतः जीव देऊन चिठ्ठीत तुझे नाव लिहूत ठेवणार, अशी धमकी सुद्धा आरोपी चुलत्याने दिली.

याप्रकरणी पीडितेने संध्याकाळी आई-वडिलांना ही बाब सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी बाळापूर पोलिस ठाणे गाठत फिर्याद नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur: विठ्ठल मुर्तीवरील लेपन प्रक्रियेला विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली; 23 व 24 तारखेला प्रक्रिया होणार

'बिघाडी'वर मतदारांचा बुलडोझर! पाली पोटनिवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला; शेकाप-भाजप-राष्ट्रवादी समीकरण कोसळले

vaibhav sooryavanshi च नाही, तर भारताच्या बाकी फलंदाजांनीही श्रीलंकन गोलंदाजांना झोडलं अन् उभं केलं डोंगराएवढं लक्ष्य

Weight Loss and Constant Fatigue: वजन कमी करण्याच्या नादात अशक्तपणा वाढतोय का? तज्ज्ञांनी सांगितले वॉर्निंग सिग्नल्स

'पहिलीच डेट आणि समीरला माझ्यासमोरच पॅनिक अ‍ॅटक आला' अशी होती नीलम कोठारी-समीर सोनीची पहिली भेट

SCROLL FOR NEXT