नागपूर

Nagpur Crime: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल, 'या' ॲपवरून झाली ओळख

मॅट्रोमोनी ॲपवरून युवतीशी ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवीत अत्याचार करणाऱ्या अभियंत्याविरोधात प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime: मॅट्रोमोनी ॲपवरून युवतीशी ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवीत अत्याचार करणाऱ्या अभियंत्याविरोधात प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
विशाल सुखदेव घोडेस्वार (वय २९, रा. सितापूर, मूर्तिजापूर, अकोला) असे आरोपी अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालने २९ वर्षीय युवतीशी मॅट्रोमोनी ॲपवरून ओळखी केली. तिच्याशी लग्न करायचे असल्याचे सांगून त्याने तिला भेटण्याची गळ घातली. युवतीने त्याला नागपूरला भेटायला बोलाविले. काही भेटींमध्ये दोघांचीही चांगली मैत्री होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले.

याचा फायदा घेत, त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. दरम्यान काही दिवसांपूर्वी तिला प्रतापनगर हद्दीतील एका हॉटेलमध्ये बोलाविले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क कमी करण्यास सुरवात केली. युवतीने त्याला लग्नासाठी विचारणा केल्यावर त्याने नकार दिला. याप्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्याचा शोध सुरू केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT