Nagpur Crime sakal
नागपूर

Nagpur Crime : आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बापलेकासह तिघांवर गुन्हा

ही आत्महत्या नसून घातपात झाल्याचा आरोप मृतकाचे वडील कुमार कवडू धनगाये (५४) यांनी केल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur Crime - आर्थिक व्यवहार व प्रॉपर्टीच्या कारणावरून छळ करीत आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या कामठीच्या जयस्तंभ चौक येथील रहिवासी बापलेकासह तिघांविरोधात मंगळवारी (ता.६)नवीन कामठी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. संजय रामस्वरुप शर्मा, राम संजय शर्मा दोघेही रा. जयस्तंभ चौक, शुभोजीत कुंडू रा. यशोधरानगर येरखेडा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंभारे कॉलोनी रहिवासी व कामठीच्या सैन्य विभागातील एपीएस विभागात स्वयंपाकी म्हणून नोकरीवर असलेल्या विश्वजित कुमार धमगाये नामक २५ वर्षोय तरुणाने मध्यप्रदेशातील शिवणी येथील के.के. लॉजच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ ऑक्टोबर २०२२ रोजी उघडकीस आली होती.

त्यावेळी आत्महत्येचे कारण कळू शकले नव्हते. ही आत्महत्या नसून घातपात झाल्याचा आरोप मृतकाचे वडील कुमार कवडू धनगाये (५४) यांनी केल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली. आर्थिक व्यवहार व प्रॉपर्टीच्या कारणावरून छळ करीत असल्याचे घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. या आधारे पोलिसांनी सदर प्रकरणात तपास करीत अखेर मंगळवारी भादंवी कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT