doctor sakal
नागपूर

नागपूर : हत्तीरोग निर्मूलनासाठी मुलांची तपासणी

६ ते ७ वयोगटाचे होणार सर्वेक्षण

राजेश प्रायकर - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील हत्तीरोगाचे प्रमाण कमी झाले नाही? याबाबत शहानिशा करण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग ६ ते ७ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करणार आहे. हत्तीरोग आजाराचा प्राथमिक संसर्ग ६ ते ७ वयोगटातील मुलांमध्येच आढळून येत असल्यामुळे आशा वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने ६ ते ७ वर्षाच्या मुलांची रक्त तपासणी करण्यात येणार आहे.

हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षणाच्या तयारी संदर्भात आज महापालिकेत टास्क फोर्सची बैठक पार पडली. यावेळी आरोग्य समिती सभापती संजय महाजन, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे, जागतिक आरोग्य संघटनेच्या झोनल समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी आणि सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. महापालिका २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण करणार आहे.

सर्वेक्षणासाठी ६ ते ७ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांचे योग्य समुपदेशन करणे आवश्यक आहे, असे डॉ. संजय चिलकर यांनी यावेळी म्हणाले. वेळेत सर्वेक्षण व्हावे यासाठी झोन सभापती, नागरसेवकांसोबत बैठक घेऊन योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. जास्तीत जास्त मुलांचे सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी पालकांनीसुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या झोनल समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी यांनी सर्वेक्षणाबद्दल मार्गदर्शन केले.

मुलांवर पाच वर्षे महापालिकेचे लक्ष

सर्वेक्षणात हत्तीरोग सकारात्मक आढळून येणाऱ्या मुलांवर त्याच दिवसापासून उपचार सुरू करण्यात येईल. पुढील पाच वर्षे या मुलांवर मनपाचे लक्ष राहील. हत्तीरोग रक्त तपासणीसाठी आरोग्य पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.

शुक्रवारी प्रशिक्षण

हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षणाचे प्रशिक्षण उद्या, शुक्रवारी मनपाच्या राजे रघूजी भोसले नगरभवन येथे घेण्यात येणार आहेत. यात सर्व वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि हत्तीरोग विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Melava 2025 Live Update : थोड्याच वेळात मनोज जरांगेंचा दसरा मेळावा, रुग्णवाहिकेतून रवाना...

Karnataka Politics : नेतृत्व बदलाची चर्चा; मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं, ‘पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार’

Nashik Festive Shopping : नाशिककरांसाठी पर्वणीच! क्रेडिट कार्ड सूट आणि मोफत ॲक्सेसरीजमुळे गॅजेट्स खरेदीत विक्रमी गर्दीचा अंदाज

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहअभ्यासक्रमांची तयारी, लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचालन

SCROLL FOR NEXT