Nanded Extortion crime news esakal
नागपूर

Nagpur : तृतीयपंथीयांवर खंडणीचा गुन्हा दाखल करणार

पोलिस आयुक्तांचे आदेश शहरात कलम १४४ लागू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात लग्न, बारसे वा कुठल्याही कार्यक्रमात घुसून जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथींयांच्या टोळ्यांवर थेट खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढले आहेत.

नागपूरमध्ये तृतीय पंथीयांचा उच्छाद चांगलाच वाढाला आहे. आता प्रत्येक चौकात टोळ्या उभ्या असतात. वाहनाचलाकांना पैशासाठी वेठीस धरले जाते. पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना अश्‍लिल शिवीगाळ करून धमक्या दिल्या जातात. याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आता चौकांसह कुठल्याही समारंभात जबरीने पैसे मागितल्यास त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढले आहे. त्यानुसार शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

तृतीय पंथीयांच्या टोळ्यांनी वस्त्या वाटून घेतल्या आहेत. त्यावरून या टोळ्यांमध्येच अनेकदा भांडणे झाली आहेत. बक्कळ कमाई होत असल्याने काहींनी हा धंदा सुरू केला आहे. तृतीयपंथी नसताना अनेक पुरूष वेषभूषा करून पैसे मागत आहेत.

अनेकदा अवास्तव पैसे मागून घरच्यांना त्रासही दिला जातो. नकार दिल्यास गोंधळ घातला जातो. अश्‍लिल शिवीगाळ तसेच अश्‍लिल वर्तनही करण्यात येते. त्यामुळे नाईलाजाने अनेकजण पैसे देत, त्यांच्याकडून पिच्छा सोडवितात. एकप्रकारे तृतीयपंथीयांनी आपली दहशतच निर्माण केली आहे. सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याने पोलिस आयुक्तांनी आदेश काढून अशा तृतीतपंथीयांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. हे आदेश १७ फेब्रुवारीपर्यंत अस्तित्वात राहणार आहेत.

असे आहेत आदेश

शहरात तृतीयपंथीयांविरोधात कलम १४४ लागू

टोळी वा एकट्याने कुठल्याही कार्यक्रमात पैशाची मागणी करण्यास मनाई

ट्रॅफिक जंक्शन,चौकात एकत्र येण्यास आणि वाहनचालक, प्रवाशांकडून पैसे मागण्यास मनाई

आमंत्रित केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमात जाण्यास बंदी

आदेशाचे उल्लंघन केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'या' तारखेपासून सुरु होणार राज्यातील शाळा, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी...

शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Road Accident: खानापूर-अल्लापुर रस्त्यावर ट्रॅक्टरची प्रवासी ऑटोला धडक; नऊ जखमी, तिघांची प्रकृती अतिगंभीर

Ipitar Web Series : प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येतोय 'इपितर' फेम 'आर्थिंग्या'; अभिनेते जयेश चव्हाण यांची माहिती

SCROLL FOR NEXT