Nagpur Flood  Sakal
नागपूर

Nagpur Flood : पावसामुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

मध्यरात्री नागपूर शहरासह जिल्ह्यात तुफान पावसाने हजेरी लावली.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - शुक्रवारी मध्यरात्री बरसलेल्या पावसाने शनिवारपर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असताना, त्यात रविवारी (ता.२४) आणखी एका मृताची भर पडली. कृष्णकुमार लेखराम बरखंडी (वय २१, रा. राणीडोंगरी, जमबाडा, बुदरूक, बैतुल, मध्यप्रदेश) यांचा धंतोली परिसरात असलेल्या गणेशसागर रेस्टॉरेट येथे भरलेले पाणी इलेक्ट्रिक पंपाने काढत असताना, विजेच्या धक्का लागल्याने मृत्यू झाला.

मध्यरात्री नागपूर शहरासह जिल्ह्यात तुफान पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. धंतोली परिसरात असलेल्या गणेश सागर रेस्टॉरेन्टमध्येही पावसाचे पाणी शिरले. ते काढण्यासाठी नोकराने इलेक्ट्रिक पंप लावला.

मात्र, त्याला विजेचा धक्का लागला आणि तो बेशुद्ध पडला. त्याला खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी समीर ताज मोहम्मद अंसारी (वय ३५, रा. वांजरा ले-आउट) याने दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

शनिवारी दगावले होते चार जण

पावसाच्या तडाख्यात शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पश्‍चिम नागपुरातील अहबाब कॉलनीमधील मिरा पिल्लई (वय ७०), तेलंगखेडीमध्ये संध्या ढोरे आणि अजनी परिसरात पाणी भरलेल्या खड्ड्यात पडल्याने जखमी होत, संजय शंकरराव गाडेगावकर (वय ५२, रा. अयोध्यानगर, साई मंदिर मागे) यांचा मृत्यू झाला. याशिवाय एका इसमाचा धंतोलीतील स्टार बस स्थानकाजवळ पाण्यात बुड्यालाने मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT