flood
flood sakal
नागपूर

Nagpur Flood : पुराने केली ८६ रस्त्यांची दुर्दशा; ३७ किमी रस्त्यांवर खड्डे, धूळ मंगळवारीमध्ये सर्वाधिक नुकसान

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - गेल्या महिन्यात २३ तारखेला आलेल्या पुराने शहरातील ८६ रस्त्यांची दुर्दशा झाली असून, महापालिकेचे ५३ कोटींचे नुकसान झाले. या पुरात एकूण ३७.१९ किमीच्या रस्त्यांची वाताहत झाली असून, मंगळवारी झोनमधील रस्त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

२३ सप्टेंबरला शहरात आलेल्या पुराने नागपूरकरांची झोप उडविली होती. नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या पुरात शहरातील रस्त्यांचीही वाताहत झाली. नुकत्याच महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणात एकूण ८६ रस्त्यांची दुर्दशा झाल्याचे पुढे आले. रस्त्यांचे ५३ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी दिली. आयुक्तांनी रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे.

सतरंजीपुरा झोनमधील तांडापेठ भागात तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचीही दुरावस्था झाल्याने ५० वर्षे टिकणारे सिमेंट रस्ते हेच काय? असा सवाल या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला. पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे नुकसान झाले. अंबाझरी परिसरातील वस्त्यांतही नुकसान झालेच, शिवाय मंगळवारी झोनमधील सर्वाधिक १५ रस्त्यांचीही दुर्दशा झाली. धरमपेठ झोनमध्ये १३ रस्त्यांची वाताहात झाली. लक्ष्मीनगर, धंतोली व आशीनगर झोनमध्ये प्रत्येकी १३ रस्त्यांची दुर्दशा झाली. बहुतांश वस्त्यांमध्ये पावसाळी नाल्या नसल्याने रस्त्यांची दुर्दशा झाल्याची बाब नासुप्रच्या ३७३ आणि १९०० ले-आऊटमध्ये उघडकीस आली.

नाल्यांचे १६३ कोटींचे नुकसान

पुरामुळे शहरातील नाल्यांचे १६३ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ते व नाल्याचे एकूण २१७ कोटींचे नुकसान झाले असून, अहवाल राज्य शासनाकडे सोपविण्यात आला आहे. राज्य शासनाकडे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मागण्यात आला आहे.

दुर्दशा झालेले रस्ते

झोन रस्त्यांची संख्या

लक्ष्मीनगर १३

धरमपेठ ११

हनुमाननगर ००

धंतोली १३

नेहरूनगर ०७

गांधीबाग ०१

सतरंजीपुरा ०६

लकडगंज ०७

आशीनगर १३

मंगळवारी १५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT