Anandacha Shidha esakal
नागपूर

Nagpur : गुढीपाडवा, रामनवमीही झाली ‘आनंदाचा शिधा’ची ओंजळ खाली

साहित्याचा पुरवठाच नाही : लाभार्थी प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण गुढीपाडवा होऊन गेला. रामनवमीही झाली. तरिही आनंदाचा शिधा मिळालाच नाही. पुरवठादाराकडून अद्याप साहित्यच देण्यात न आल्याने लाभार्थी शिधाच्या आनंदापासून वंचित आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकारने गेल्या वर्षी दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ योजना राबवली होती. त्यावेळी अनेक भागांत दिवाळी संपल्यानंतर ‘आनंदाचा शिधा’ जनतेपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे या योजनेवर विरोधकांकडून जोरदार टीका झाली. परंतु ही योजना यशस्वी झाल्याचा दावा करीत सरकारने यंदाही ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य गटातील कार्डधारकांना १०० रुपयात एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे. पण गुढीपाडवा होऊन आज दहा दिवसाचा कालावधी लोटला. लाभार्थ्यांना मात्र शिधा मिळालाच नाही. पुरवठादाराने पूर्ण साहित्य दिले नाही. त्यामुळे अनेक दुकानात शिधाच पोहचली नाही.

पुरवठादारावर कारवाई नाही

गुढीपाडव्यालाच सर्व साहित्य दुकानात येणे अपेक्षित होते. परंतु पुरवठादाराने साहित्य दिले नाही. चार साहित्यापैकी काही साहित्य दिले असून काही साहित्य आलेच नाही. मागणी केल्यावरही त्यांच्याकडून तो होत नाही. त्यामुळे लाभार्थी वंचित आहे. परंतु अद्याप पुरवठादारावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शासनाकडून पुरवठादाराला अभय देण्यात येत असल्याचे दिसते.

साखरेचा सर्वाधिक पुरवठा

पुरवठादाराला साखर, रवा, चनाडाळ व पामतेल द्यायचे आहे. परंतु त्यांच्याकडून सर्वाधिक सारख देण्यात आली. चनाडाळ गरजेच्या निम्म्याही दिली नाही. इतरही साहित्याची स्थिती तशीच आहे. हे साहित्य देण्यासाठी पिशवीही द्यायची आहे. परंतु या पिशव्यांचा २० टक्के पुरवठा झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : आक्रमक राजकारणाला काहीही स्थान नाही - शायना एनसी

SCROLL FOR NEXT