Nagpur
Nagpur Sakal
नागपूर

नागपूर : गुंठेवारी शुल्क झाले १६८ रुपये

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महविकास आघाडीने गुंठेवारी शुल्कात ५६ रुपयांवरून तब्बल १६८ रुपये अशी तीनपट वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भूखंड घेणे अधिकच महाग होणार आहे. ठाकरे सरकारची ही जनतेला भेट असल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे.

शहरातील अनियमित भूखंड नियमितीकरणासाठी गुंठेवारी कायदा लागू करण्यात आला आहे. याकरिता ५६ रुपये प्रति चौरस फूट शुल्क नियमितीकरणासाठी घेण्यात येत होते. नागपूर सुधार प्रन्यासच्यावतीने शहरात अनधिकृत भूखंडाचे नियमितीकरण केले जात आहे. स्वस्त भूखंड घेऊन घरकूल उभारल्यानंतर विकास शुल्क आकारल्या जात असल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. विकास शुल्क भरल्यानंतरही सर्व सुविधा मिळेलच याची खात्री नाही. फक्त कागदोपत्री आर.एल. एक शिक्का मारला जातो. हा शिक्का असल्याशिवाय बँकेचे कर्जही मिळत नाही. त्यामुळे माफक शुल्क नियमितीकरणासाठी आकारण्यात यावे अशी मागणी जनतेची होती. सध्या गुंठेवारी अंतर्गत नियमितीकरणाची मुदत २००१वरून २०२०पर्यंत वाढवण्यात आली आहे. पाच ते सात लाखांच्या हजार चौरस फुटाच्या भूखंडासाठी दीड ते पावणे दोन लाख रुपये वाढीव शुल्कामुळे नागरिकांना भरावे लागणार आहे.

ही तर लूटः कृष्णा खोपडे

भूखंडधारकांच्या सोयीसाठी गुंठेवारीची मुदत वाढवल्याचे महाविकास आघाडी सरकारच्यावतीने सांगण्यात येत आहे. मात्र, तीन पट विकास शुल्कात वाढ करून आघाडी सरकार जनतेची लूटमार करीत असल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. इंधन तसेच इतर महागाईवर गळे काढताना महाविकास आघाडीचे नेते व वाढीव गुंठेवारी शुल्कावर का बोलत नाही असाही सवाल खोपडे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT