nagpur
nagpur  sakal
नागपूर

Nagpur : आरोग्य योजना लोकांपासून दूरच; म. फुले जनआरोग्य योजनेत पाच लाखांचा लाभ नाही

केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर - गोरगरिबांची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आता राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आली आहे. नव्या बदलानंतर यात २ कोटी कुटुंबांचा समावेश होणार आहे. या सर्वांना या योजनेअंतर्गत आरोग्य विमा उपचाराचे कवच पाच लाखापर्यंत करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पाच लाखांच्या मदतीचा आठ महिन्यांत एकालाही लाभ झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

ही घोषणा शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. सार्वजनिक आरोग्य विभागाने अध्यादेश जारी केला. मात्र ही घोषणा कागदावरच राहिली. फेब्रुवारी २०२३ मध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सरकारने राज्यातील एक हजार रुग्णालयांचा सहभाग व ९९६ आजारांचा समावेश करून १ हजार ३५६ आजारांसाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला.

सध्या या योजनेद्वारे दीड लाख रुपयांचा तर किडनी प्रत्यारोपणासाठी अडीच लाखांची मदत मिळते.शासनाने ही मर्यादा पाच लाखांवर नेल्याची घोषणा केली. सध्या पिवळ्या आणि तांबड्या रेशनकार्ड, अंत्योदय अन्न योजना रेशन कार्डधारक आणि शेतीच्या बाबतीत १४ मागास जिल्ह्यातील अन्नपूर्णा रेशनधारक, शासकीय अनाथाश्रमातील मुले, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येतो.

नव्या बदलांमध्ये राज्यातील सर्व नागरिकांना योजनेचा लाभ देण्याचे ठरले. मात्र आठ महिन्यानंतरही पाच लाखांच्या मदतीचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे आरोग्य सुरक्षा कवच गुलदस्त्यात आहे. अद्याप या योजनेची अंमलबजावणी न झाल्याने रुग्णांचे नातेवाईक थेट सरकारी रुग्णालयावरच खापर फोडत असल्याची माहिती पुढे आली.

पाच लाखांच्या मदतीचे लाभार्थी

पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब

शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंब (शासकीय कर्मचाऱ्यांसह)

कोणत्याही प्रकारची शिधापत्रिकाधारक नसलेले कुटुंब

राज्यातील शासकीय निमशासकीय व खासगी कर्मचारी

किडनी प्रत्यारोपणासाठी जुन्या निकषानुसार २ लाख ५० हजार रुपयांची तरतूद होती नव्या निकषानुसार ४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली

योजनेचा इतिहास

सुरुवातीला २०१२ मध्ये ही योजना कॉंग्रेस सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजना नावाने सुरू केली होती. २०१३ मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते नागपुरात सर्व जिल्हयात लागू करण्यात आल्याचे जाहीर केले. आतापर्यंत गरीब रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहेत.

योजनेत सध्या ९९६ आजारांचा समावेश होता. यानंतर २०१५ मध्ये राज्यात भाजप सेनेचे सरकार आले आणि राजीव गांधी जीवनदायी योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना असे या योजनेचे नवे बाळसे करण्यात आले. नुकतीच या योजनेच्या लाभाची व्याप्ती वाढवत राज्यातील सर्वांनाच पाच लाखांचे आरोग्य विम्याचे कवच लागू करण्याची घोषणा केली.नव्या बदलानंतर योजनेत २.२ कोटी कुटुंबांचा समावेश होईल असे सांगण्यात आले. दरवर्षी दीड लाखांवर रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT