Nagpur Hit And Run Case Sakal
नागपूर

Nagpur Hit And Run Case : एमआयडीसीत ‘हिट ॲण्ड रन’;विद्यार्थिनींसह तिघे जखमी, धडक देऊन चालक फरार

Nagpur Accident : गंभीर जखमी राजेश्‍वरीला एम्समध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी सय्यद साजिदला अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : एमआयडीसीमधील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर मोपेडवरून ट्रिपल सिट जाणाऱ्या विद्यार्थिनींना कारने धडक देत, गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (ता.२९) मध्यरात्री दीडच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी कारचालकाला पोलिसांनी अटक केली.

सय्यद साजिद सय्यद साहिल (वय २९, रा. हसनबाग) असे आरोपी कारचालकाचे नाव असून राजेश्‍वरी नरेशचंद्र पाटील (वय २०), हिरल तुषार आठवले (वय १९, रा. लक्ष्मीनगर) आणि ओम पाटील (वय १६) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरल, रामेश्‍वरी या दोघीही बी.टेक.द्वितीय वर्षाला असून रामेश्‍वरीचा भाऊ ओम अकरावीत शिकतो.

तिघेही राजेश्‍वरीच्या मोपेडवरून (एमएच ३१, ईव्ही ९९५६) लता मंगेशकर हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जात असताना, त्यांना समोरून भरधाव कारने (एमएच ४३,एजे ६१९७) धडक दिली. त्यात हिरलच्या पायाला दुखापत झाली. तिला आणि ओमला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान गंभीर जखमी राजेश्‍वरीला एम्समध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी सय्यद साजिदला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT