income tax sakal
नागपूर

Nagpur : एटीएसनंतर परवेझवर इनकम टॅक्सचा फेरा; बेहिशेबी मालमत्तेचा तपास; एटीएसची कारवाई

परवेझकडे असलेली बेहिशेबी रोख रक्कम आणि बनावट नोटा चलनाच्या प्रकरणात गुंतल्याचे संकेत मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - बनावट चलन आणि बेहिशोबी मालमत्ता यातून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शहरातील हसनबाग परिसरात बुधवारी (ता.१८) दुपारी तीन ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात पथकाने २७ लाख ५० हजार रुपयांची बेहिशेबी रोख जप्त केली. दरम्यान एटीएसची चौकशी संपली असली तरी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आता परवेझ पटेल आणि त्याचा सहकारी अब्दुल वसीम आता आयकर विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. त्याबाबत एटीएसने आयकर विभागाकडे विनंती केली आहे.

परवेझकडे असलेली बेहिशेबी रोख रक्कम आणि बनावट नोटा चलनाच्या प्रकरणात गुंतल्याचे संकेत मिळाल्यानंतर हे छापे टाकण्यात आले. दुपारी एटीएसच्या तीन वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी परवेझचे निवासस्थान, त्याचे कार्यालय आणि अब्दुलच्या घराची झडती घेतली.

सुमारे तीन तासांच्या अथक शोधानंतर, एटीएसला परवेझच्या घरातील लॉकरमधून तब्बल २७ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात यश आले. या बेहिशेबी संपत्तीचा स्रोत शोधण्यासाठी एटीएस अधिकाऱ्यांनी पटेल यांची चौकशी केली. दरम्यान त्यात बनावट नोटा आढळून न आल्याने त्याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी एटीएसकडून आयकर विभागाला परवेझच्या चौकशीचे पत्र देण्यात आले आल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले. त्यातून लवकरच त्याच्यावर आयकर विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

अनेकांची फसवणूक

परवेझ पटेल याच्यावर नंदनवन पोलिसांनी या वर्षी एप्रिलमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मध्य प्रदेशातील राकेश उमरे याला १ कोटी २५ लाख रुपये परत करण्याचे आश्वासन देऊन २५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर होता. पराग मोहोड, कांचन गोसावी आणि अन्य दोघांना फसवणूक प्रकरणात गोवण्यात आले. परवेझने पीडितांना धमकावण्यासाठी, पोलिस अधिकाऱ्यांची मदत घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Pune News: गड्या आपला गावच बरा! युद्धानंतर महागाईचा भडका, २० रुपयांचे पोहे ३५ रुपयांवर; विद्यार्थ्यांनी धरली गावची वाट

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Chhatrapati Sambhajinagar: पुण्यातील मेसवर गॅस टंचाईचा फटका; चुलीवर स्वयंपाक, मेन्यू बदलला.

SCROLL FOR NEXT