नागपूर

Nagpur Crime: उधारीचा वाद जीवावर बेतला; वारंवार टाळाटाळ करण्याचा महिलेचा खून, मृतदेह फेकला कन्हान नदीत

जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा खून करीत, मृतदेह नदीत फेकल्याची घटना मंगळवारी रात्री समोर आली. महिलेला दिलेल्या उधारीच्या पैशाच्या वादातून तिघांनी तिचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

Manoj Bhalerao

Nagpur Crime: जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा खून करीत, मृतदेह नदीत फेकल्याची घटना मंगळवारी रात्री समोर आली. महिलेला दिलेल्या उधारीच्या पैशाच्या वादातून तिघांनी तिचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

शीतल उके (वय ४२, रा. बाराखोली) असे मृत महिलेचे नाव असून रोहित ऊर्फ सुनील शत्रुघ्न उसरबरसे (वय २१), आर्यन सीताराम महतो (वय १९, दोन्ही रा. माढा कॉलनी, भुसा कंपनी जवळ, कपिलनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याशिवाय एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल प्रिन्स सर्फेस शॉप या दुकानात काम करायची. या दुकानाच्या परिसरात असलेल्या एका कंपनीमध्ये सुनील काम करायचा. तिथेच दोघांचीही ओळखी झाली. त्या ओळखीतून त्याने शीतल उके यांना काही महिन्यांपूर्वी त्याच्या ओळखीच्या दुकानातून ६५ हजारांच्‍या टाइल्सची खरेदी करून दिली होती. (Latest Marathi News)

दरम्यान, त्याचे पैसे तिने दिले नव्हते. दुकानदाराकडून या पैशाची सुनीलला मागणी होत होती. त्यामुळे त्याने शीतल यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. मात्र, ती पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होती. याचा सुनीलच्या मनात राग होता. त्यातून त्याने शीतलचा गेम करण्याची योजना आखली.

यामध्ये मित्र, आर्यन आणि स्वतःच्या लहान भावास सोबत घेतले. २७ तारखेला सकाळी त्याने शीतलची भेट घेतली. तिच्यावर शस्त्राने वार करीत, खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह बोरीमध्ये भरून तो आणि आर्यन दोघेही मोटारसायकलने रात्रीच्या सुमारास कन्हान नदीच्या पुलावर आले. तिथून त्याने मृतदेह नदीत फेकून दिला. (Latest Marathi News)

महिला घरी परत न आल्याने नातेवाइकांनी तिच्या मिसिंग ची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याचा तपास केला असता, कॉल डिटेल्स आणि काहींच्या सांगण्यावरून मंगळवारी (ता.९) सुनील आणि आर्यनला ताब्यात घेतले. त्यांनी कबुली देताच, गुन्हा दाखल केला आणि अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले. यावेळी त्याला न्याय दंडाधिकारी न्यायालयासमोर सादर केले असता, दोघांचीही पाच दिवसाचा पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT