सुनील केदार
सुनील केदार sakal
नागपूर

नागपूर : स्थानिकांना युवकांना वेकोलीत रोजगार देणार - सुनील केदार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्थानिक युवकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याविषयी वेस्टन कोल फिल्ड लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन आज पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.

जिल्हा परिषदेच्या टेकाडी सर्कलअंतर्गत येणाऱ्या जुनी कामठी, कांद्री आणि टेकाडी या ग्रामपंचायतींमधील विविध विकासकामांचे भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, पारशिवनी पंचायत समिती सभापती मीना कावळे, उपसभापती चेतन देशमुख, माजी आमदार एस. क्यू. जामा, पंचायत समिती सदस्य करुणा भोवते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, कोविड काळात जिल्हा परिषदेने उत्तम कामामुळे त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करता आल्या. आता कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली आहे.

संसर्ग आटोक्यात आल्याने विकासकामांना गती देण्यात आली आहे. यामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन नळजोडणी करुन प्रत्येकाच्या घरी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. स्थानिक युवकांना नोकरीमध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे म्हणाले, जिल्हा परिषदेकडून विविध विकासकामे सुरु आहेत. कोविड काळात पारशिवनी तालुक्यात वेळीच विलगीकरण केंद्र सुरु केल्यामुळे अनेक ग्रामीण नागरिकांचे जीव वाचवता आल्याचे सांगून खनिज विकास निधीतून ११ रुग्णवाहिका मिळवून दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कांद्री कन्हान येथे गांधी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नागरी सुविधा योजना, जनसुविधा योजना, आरोग्य देखभाल दुरुस्ती योजना, वस्ती सुधार योजना, रमाई आवास योजना, ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम, रस्ते विस्तारीकरण, पाणंद रस्तेनिर्मिती, सिमेंट रस्ते बांधकाम, सामाजिक सभागृह बांधकाम, रस्ता खडीकरण, सामाजिक स्वयंपाकगृह बांधकाम, नाली बांधकाम, व्यसनमुक्ती केंद्र बांधकाम आदी एकूण १४ कोटी ५० लाख रुपये किमतीच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT