Muslim Voters  Esakal
नागपूर

Muslim Voters: मुस्लिमांचा कौल कोणाकडे? मुस्लीम मतदारांची भूमिका महत्त्वाची; मतदान वाढविण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न

नागपूर लोकसभा मतदारसंघात सुमारे दीड लाखांच्या घरात असलेल्या मुस्लिम मतांवर सर्वांचा डोळा आहे. अधिकाधिक मुस्लिमांनी मतदानात सहभागी व्हावे, याकरिता सध्या काँग्रेसमधून कसोशीने प्रयत्न केले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Muslim Voters in Loksabha: नागपूर लोकसभा मतदारसंघात सुमारे दीड लाखांच्या घरात असलेल्या मुस्लिम मतांवर सर्वांचा डोळा आहे. अधिकाधिक मुस्लिमांनी मतदानात सहभागी व्हावे, याकरिता सध्या काँग्रेसमधून कसोशीने प्रयत्न केले जात आहे.

मुस्लिम समाजाचे सध्या रोजे सुरू आहेत. त्यामुळे प्रचारात मुस्लिम बांधवांची संख्या फार कमी आहे. ११ मार्चला रमजान ईद आटोपल्यानंतर मुस्लिम वस्त्यांमध्ये प्रचाराचा धडाका वाढणार आहे. मुस्लिम मतदार हा काँग्रेसची परंपरागत मतपेढी मानला जातो. मात्र मुस्लिम बांधव फारसे मतदान करीत नाही. त्यातही महिला आणि मुलींची संख्या फार कमी असते. त्यामुळे एकगठ्ठा मतदान असतानाही त्याचा फायदा काँग्रेसला उचलता आलेला नाही. यावेळी ‘एमआयएम'' पक्षाने मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रखर हिंदुत्वाची भाषा बोलत असल्याने मुस्लिम समाज नाराज आहे. तो भाजपला मतदान करेल असे दिसत नाही. याची भीती भाजपला सतावत आहे. भाजपच्यावतीने ताजाबादचे अध्यक्ष प्यारे खान मुस्लिमांना भाजपकडे नव्हे तर गडकरी यांच्याकडे बघून मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. गडकरी यांची प्रतिमा, धर्मनिरपेक्ष राजकारण, केलेला विकास यांची माहिती ते मुस्लिम बांधवांना पटवून देण्याचे काम काम करीत आहे. (Latest Marathi News)

बोलण्याच्या ओघात प्यारे खान यांनी भाजपमुळे नव्हे तर गडकरी स्वतःच्या बळावर निवडून आले असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याचा हा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. काँग्रेसच्यावतीने याचे राजकरणही केले जात आहे. भाजपच्या अधिकाधिक कार्यकर्त्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे.

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून अनिस अहमद दोन वेळा निवडून आले होते. ते राज्यात मंत्रीसुद्धा होते. मतदारसंघ बदलवताच त्यांचे राजकारण संपुष्टात आले आहे. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्याही सोबत त्यांचे फारसे सौख्य नाही. पश्चिम नागपूरमध्ये उमेदवार असताना काँग्रेसच्याच काही नेत्यांनी पाडल्याचा त्यांनी खाजगीत आरोप केला होता. ते महाविकास आघाडीत आहेत. त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची राहणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jewellers Strategy Gold: सोने विक्रमी उच्चांकावर असताना सराफ “विक्री करा” ऐवजी “आणखी खरेदी करा” असे का सांगतात?

Loni Kalbhor News : कोचिंग क्लासला गेलेली १४ वर्षीय मुलगी बेपत्ता; भावाचे लक्ष नसल्याची संधी साधून पळवून नेल्याचा संशय

Melbourne Vasai Easter Fest: मेलबर्नमध्ये वसईची परंपरा कायम: २१ वर्षांपासून इस्टर मेळाव्यात लोकसंगीत, नृत्य, खाद्यसंस्कृतीचा जल्लोष

Vaijapur Accident : मोठी बातमी! भोंदू बाबा अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन; समृद्धी महामार्गावर कंटेनरला कारची पाठीमागून जोरदार धडक

Rahul Gandhi : पंतप्रधान आणि मला तर बायकोसुद्धा नाही... ; राहुल गांधी असे काय म्हणाले ज्यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ झाला?

SCROLL FOR NEXT