Nagpur weather update
Nagpur weather update sakal
नागपूर

नागपूर : दमदार पावसाने नागपूरकर सुखावले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चार दिवसांपूर्वी मॉन्सूनचे विदर्भात आगमन झाले खरे. मात्र अपेक्षेप्रमाणे धुवाधार न बरसल्याने सर्वांचीच घोर निराशा झाली. मात्र उशिरा का होईना वरुणराजाने सोमवारी दणक्यात हजेरी लावल्याने नागपूरकर चांगलेच सुखावले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह कोसळलेल्या जोरदार पावसाने अख्खे शहर धुऊन काढले. हवामान विभागाने तीन-चार यलो अलर्ट दिल्याने विदर्भात आणखी पाऊस अपेक्षित आहे.

गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीवर काळेकुट्ट ढग जमा होत आहेत. दमदार पावसाने नागपूरकर सुखावले मात्र पाऊस दांडी मारायचा. सोमवारीही दुपारी काही भागांत हलक्या सरी बरसल्यानंतर पुन्हा ऊन पडले. वरुणराजाचा लपंडाव सुरू असताना साडेसातच्या सुमारास अचानक वादळ सुटून धो-धो पावसाला सुरवात झाली. जवळपास तास दीड तास शहरात सर्वत्र मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसला. पावसामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांना आडोसा शोधावा लागला. तर अनेकांना ओल्या शरीराने घर गाठावे लागले. पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले होते. त्यामुळे रेनकोट व छत्र्याही बाहेर पडल्या. काही भागांत बत्तीही गुल झाली.

मात्र त्याउपरही नागपूरकरांनी यंदाच्या पहिल्याच दमदार पावसाचा आनंद घेतला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन चार महिन्यांपासून गरगरा फिरणारे पंखे व कुलरही थंडावले. शहरात रात्री साडेआठपर्यंत ११.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात पुढील तीन-चार दिवस यलो अलर्ट असल्यामुळे या आठवड्यात वरुणराजा आणखी बरसण्याची दाट शक्यता आहे. आजच्या पावसामुळे बळीराजाही सुखावला आहे. त्यामुळे पेरण्याचीही लगबग वाढणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT