Nagpur municipal corporation drainage line 
नागपूर

नागपूर : उपराजधानी पुन्हा तुंबणार!

ड्रेनेज लाइनमध्ये कचरा कायम : अनेक ठिकाणी सफाई नाहीच : स्वच्छतेनंतरही नाल्यात कचरा

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात अद्यापही जोरदार पाऊस बरसला नसल्याने महापालिकेसाठी सध्याची स्थिती ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ अशी आहे. २०१३ मध्ये काही तासांमध्येच झालेल्या अतिवृष्टीने नागपूर तुंबले होते. यंदाही जर जोरदार बरसला तर उपराजधानी तुंबल्याशिवाय राहणार नाही. कारण अजूनही शहराच्या अनेक भागात ड्रेनेज लाइनमध्ये कचरा साचलेला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मनपाने आवश्यक ती काळजी न घेतल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेने पावसाळ्यापूर्वी तयारी म्हणून शहरातील नदी, नाल्यांची स्वच्छता केली. यातही काही नाल्यांची स्वच्छता केवळ औपचारिकता म्हणून करण्यात आली तर काही नाल्यांमध्ये स्वच्छतेनंतर पुन्हा कचरा टाकण्यात आल्याने ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. नाले, नदी स्वच्छ करताना शहराच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या ड्रेनेज लाइन स्वच्छ केल्या नसल्याचे अयोध्यानगर, मानेवाडा रोडवर दिसून येत आहे. आयआरडीपीच्या अनेक रस्त्यांवरील ड्रेनेज लाइन स्वच्छ नाही किंवा पुढे पाणी वाहून नेईल, अशी सोय राहीली नसल्याचे चित्र आहे. रामदासपेठ सेंट्रल बाजार रोडवर ड्रेनेज लाइनवर फुटपाथ आहे. क्रिम्स हॉस्पिटलजवळ चेंबर तुटले असून त्यावरील झाकण दूर पडलेले आहे.

या चेंबरच्या आतमध्ये डोकावल्यास पुढे पाणी वाहून जाण्याची सोयच नाही. अर्थात ही ड्रेनेज लाईन या हॉस्पिटलपर्यंतच असल्याचे दिसून येत आहे. झिंगाबाई टाकळी येथे झेंडा चौक ते फरसपर्यंत सिमेंट रस्त्याची कामे करताना या भागातील सिवेज लाइनही फोडून ठेवण्यात आली. हेच चित्र शहराच्या विविध भागातही आहे. त्यामुळे येत्या काळात अतिवृष्टी झाल्यास अयोध्यानगर रोड, मानेवाडा रोड, रामदासपेठ सेंट्रल बाजार रोड, झिंगाबाई टाकळी ते फरस रोडसह अनेक रस्ते पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरकरांची तारांबळ उडणार आहे.

शहर तुंबण्याची प्रमुख कारणे

  • रस्ते झाले उंच झाले तर वस्त्या गेल्या खाली

  • ड्रेनेज लाईन, मलवाहिनी झाली कचराघर

  • दाट वस्त्यांमुळे पाण्याचा निचरा नाही

  • बिल्डिंग फाउंडेशनची लेव्हल सारखी नाही

  • उघडे मेनहोल, आयआरडीपी रस्त्यांच्या नाल्या बुजल्या

अतिवृष्टी झाल्यास या भागांना बसणार फटका

  • अयोध्यानगर,

  • मानेवाडा

  • सेंट्रल बाजार रोड, रामदास पेठ

  • झिंगाबाई टाकळी

  • फेडर रोड

  • बजाजनगर

  • काचीपुरा चौक

  • ग्रेट नागरोड

  • लक्ष्मीनगर चौक

अनेक चौकात खोलगट भाग तयार

शहरात तयार झालेले सिमेंट रस्ते केवळ चौकांपर्यंत किंवा चौकांपासून पुढे तयार करण्यात आले आहेत. सिमेंट रस्ते उंच झाल्याने चौकांमध्ये खोलगट भाग तयार झाला आहे. बजाजनगर, काचीपुरा चौक, ग्रेट नाग रोडने प्रवास केल्यास जगनाडे चौक, लक्ष्मीनगर चौकात थोड्या पावसानेही तलाव तयार होतो. गेली अनेक वर्षे ही समस्या कायम आहे. परंतु, महापालिकेने हे चौक रस्त्याच्या समतल करण्यासाठी अद्यापही पाऊल उचलले नाही. त्यामुळे यंदाही जोरदार पावसात हे तलाव पार करताना नागपूरकरांचा कस लागणार आहे.

घरांमध्ये पाणी साचण्याचा धोका

गेल्या सात वर्षांत घरात वा वस्त्यांत पाणी शिरण्याच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. अनेक भागांमध्ये रस्ते दोन फूट उंच करण्यात आले. त्यामुळे रस्ते आणि घरांची पातळी सारखी राहिली नाही. रस्त्यावर पडणारे पाणी मॅनहोलमधून किंवा रस्त्यांवरून सहज वाहून जाईल, अशी परिस्थितीच राहिली नाही. परिणामी सर्व पाणी लोकांच्या घरात, वस्तीत आणि झोपडपट्टीत शिरण्याचा धोका यंदाही कायम आहे. जुन्या वस्त्यांमध्ये ही समस्या प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांत भीतीचे वातावरण कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT