nagpur  sakal
नागपूर

Nagpur News : आरोपीला पोलिस ठाण्यात व्हीआयपी सेवा, बालिकेचे ४ वर्षांपासून करीत होता शोषण

हुडकेश्वर पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - बालिकेला घरात डांबून अमानुष अत्याचार करणाऱ्या जावई-साळ्याला हुडकेश्वर पोलिसांकडून व्हीआयपी सुविधा मिळत असून दोघांनाही एखाद्या पाहुण्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

तपासानुसार गेल्या ४ वर्षांपासून आरोपी हे बालिकेचे लैंगिक शोषण करीत होते. तिच्या गरीब आई-वडिलांना त्यांच्या मुलीचे शिक्षण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र नागपूरला आणल्यानंतर तहा अरमान खान, अजहर खान आणि हीना खानने तिच्यावर अत्याचार सुरू केले. हीना तिच्याकडून घरचे संपूर्ण काम करून घेत होती.

तिच्याकडून लहानशी चूक झाली तरी सिगारेट, चाकू आणि तव्याचे चटके दिले जात होते. अरमानचा साळा अजहर विकृत प्रवृत्तीचा आहे. तो पीडितेवर अनैसर्गिक अत्याचार करीत होता. तिच्या शरीराचा विकास व्हावा म्हणून तिला इंजेक्शन आणि औषध दिले जात होते. या प्रकरणात सर्वप्रथम पोलिसांनी तहा याला अटक केली होती.

त्यानंतर अजहरला अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान हुडकेश्वर पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

सोशल मीडियावर आरोपीचा फोटो व्हायरल होत आहे. त्यात तो पोलिस अधिकाऱ्याच्या टेबलजवळ बसून मोबाईलवर बोलताना दिसत आहे. नागरिकांनी आरोप केला आहे की, आरोपींसाठी हॉटेलातून आवडीचे जेवण तसेच फिल्टरचे पाणी सुद्धा मागविण्यात येत आहे.

दररोज त्याला भेटायला काहीजण येतात. इतके संवेदनशील प्रकरण असतानाही आरोपींबाबत पोलिस सहानुभूती दाखवत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

हिनासमोरच करायचे अत्याचार

बंगळुरूवरून विकत आणलेल्या १२ वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके देऊन पती आणि भाऊ लैंगिक शोषण करीत असल्याची माहिती हिना हिला होती. मात्र, तिनेच मुलीला दम देऊन गप्प राहून त्यांची मर्जी राखण्यासाठी बाध्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिना आणि भाऊ अझहर शेख यांनी चौकीदाराला ५० हजार रुपये देऊन १२ वर्षीय मुलीला घरकाम करण्यासाठी विकत घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT