nagpur sakal
नागपूर

Nagpur News : भाजपचे ३० हजार सुपर वॉरिअर्स ;चंद्रशेखर बावनकुळे पदाधिकाऱ्यांशी संवाद

नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्ससोबत त्यांनी शनिवारी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - भाजपा राज्यभरात ३० हजार सुपर वॉरिअर्स तयार करणार असून ते पुढील तेरा महिन्यात दररोज तीन तास काम करून भाजपाच्या विजयाचे शिल्पकार होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्ससोबत त्यांनी शनिवारी शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात संवाद साधला. नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ होतील अशा दावाही बावनकुळे यांनी केला.

प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, भाजपाचे विभागीय संघटन सरचिटणीस डॉ. उपेंद्र कोठेकर, लोकसभा निवडणूक प्रमुख आ. प्रवीण दटके, शहराध्यक्ष बंटी कुकडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, माजी आ. अनिल सोले, माजी आ. मिलिंद माने, व्यापारी आघाडी प्रदेशाध्यक्ष विक्की कुकरेजा, विधी आघाडी प्रदेश अध्यक्ष उदय डबले, माजी महापौर दयाशंकर तिवारी समन्वयक, मंडल अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणीतील सदस्य व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मतदारांना दीड कोटीपर्यंतचा लाभ दिला

बावनकुळे म्हणाले, पंचायत ते लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सुपर वॉरिअर्स ५१ टक्के मते मिळावित यासाठी नियोजन करतील.

मोदी सरकारने प्रत्येक बुथवर विविध योजनेच्या माध्यमातून नागरिकांना एक ते दीड कोटी रुपयांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ दिला आहे. कोविड लसीकरण, आयुष्यमान भारत, मोफत अन्न योजना, किसान सन्मान निधी व आता विश्वकर्मा योजना अशा योजनांतून हा फायदा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT