arun fanshikar 
नागपूर

Nagpur News : ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकरांचा मृत्यू! विहिरीत आढळला मृतदेह

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : विविध प्रिंट माध्यमांमध्ये प्रदीर्घ काळ आपल्या लेखणीचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर (वय ७२) यांच्या मृतदेह गुरुवारी त्यांच्याच घरच्या विहिरीत आढळला. त्यांच्या कमरेला दोरीने दगड बांधल्याचे आढळले असून या घटनेने खळबळ उडाली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.

गिरीपेठ येथे भाऊ अनिल फणशीकर यांच्यासह ते वास्तव्यास होते. त्यांनी हितवाद, इंडियन एक्सप्रेस, हिंदुस्तान टाईम्स यासारख्या वर्तमानपत्रात विविध पदांवर काम केले होते. त्यातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. महिनाभरापासून फिरायला गेले नसताना गुरुवारी पहाटे अचानक साडेपाच वाजता ते फिरायला घराबाहेर पडले. दरम्यान बराच उशीर झाल्यावरही ते घरी न परतल्याने त्यांचे बंधू अनिल फणशीकर यांनी सकाळी साडेनऊ वाजता पोलिसांकडे त्यांच्या हरवल्याची तक्रार दाखल केली.

सीताबर्डी पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. दुपारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस ताफ्यासह तपास करीत असताना त्यांच्या घरच्या विहिरीत फायर ब्रिगेडच्या माध्यमातून तपासणी केली असता, त्यांचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे त्यांच्या पोटाला दोरीच्या सहाय्याने दगड बांधल्याचे दिसले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांनी तत्काळ मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयोत रवाना केला.

घरात होते दोघेच बंधू

अरुण फणशीकर हे अविवाहित असून त्यांच्या बंधूंची पत्नी आपल्या मुलांकडे अमेरिकेला गेल्या आहेत. त्यामुळे ते दोघेच घरी होते. बुधवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत त्यांनी भावासोबत टीव्ही बघितला. त्यानंतर ते झोपायला गेले. महिन्याभरापासून ते फिरायला गेले नव्हते. सकाळी असे घडल्याने त्यांचे बंधू आनंद फणशीकर यांना जबर धक्का बसला आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून तपासास सुरुवात केली आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यानी भेट देऊन तपासणी केली.

फिरायला बाहेर पडलेच नाही

घरातून अरुण फणशीकर फिरण्यासाठी निघाले. मात्र, ते कम्पाऊंडबाहेर गेलेच नाही. यावेळी तपासणीदरम्यान कम्पाऊंडला कुलूप लागल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी कयास लावून विहिरीची तपासणी केली. त्यातून त्यांचा दोरीने कमरेला दगड बांधून असल्याचे आढळून आले. यावेळी कुणालाही आवाज येऊ नये यासाठी त्यांनी हळूहळू विहिरीत उतरले असावे असाही कयास पोलिसांनी तपासादरम्यान लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT