nagpur sakal
नागपूर

Nagpur News : नागपूरमध्ये होणार पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये

राज्य शासनाकडून ४५ पदांनाही मंजुरी; ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - शहरात ५ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करून ४५ पदांना मंजुरी देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

‘दै. सकाळ’ने ‘पाच वर्षात १८ हजारांवर प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात’ या मथळ्याखाली ३१ डिसेंबर २०२२ रोजी वृत्त प्रसिद्ध करीत कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर रीतसर माहिती दिली होती. याच वृत्ताची दखल घेत राज्य शासनाने मंगळवारी पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयांसह ४५ पदांना मंजुरी दिली.

कौटुंबिक कलहातून न्यायाच्या अपेक्षेसह कौटुंबिक न्यायालयामध्ये दावे दाखल केले जातात. गेल्या पाच वर्षांची (२०१८ ते नोव्हेंबर २०२२) आकडेवारी पाहिल्यास १८ हजार २७१ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली. यात सर्वाधिक १३ हजार २३९ दिवाणी प्रकरणांचा समावेश आहे.तर, ५ हजार ३२ फौजदारी प्रकरणे या पाच वर्षात दाखल करण्यात आली.

सध्या नागपूर येथे ४ कौटुंबिक न्यायालये असून वाढत्या कौटुंबिक विवादांच्या प्रकरणांमुळे ही ५ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. आजही नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयांमध्ये ८ हजार ४१८ न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्याचेसुद्धा शासनाने म्हटले आहे. या न्यायालयांच्या उभारणीपोटी ५ कोटी ६० लाख ५४ हजार खर्चास देखील शासन मान्यता देण्यात आली. त्यामुळे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी मदत होणार आहे.

दृष्टीक्षेपात प्रकरणे

वर्ष दाखल प्रकरणे

२०१८ ४ हजार १०

२०१९ ४ हजार २८

२०२० २ हजार ३४५

२०२१ ३ हजार ९०५

२०२२ ३ हजार ९८३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT