court sakal
नागपूर

Nagpur News : ‘सुनेने केले माझ्या मुलाचे अपहरण'; वृद्ध आईची उच्च न्यायालयात याचिका

मुलाची व्यसनमुक्ती केंद्रातून सुटका

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - आपल्या सुनेनेच मुलाचे अपहरण करून त्याला व्यसनमुक्ती केंद्रात डांबल्याचा आरोप करीत वृद्ध आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेत मुलाचा ताबा मिळावा (हेबियस कॉर्पस) म्हणून याचिका दाखल केली. सुनावणी दरम्यान पत्नी, आईसह दुखः मुलगा हजर झाल्याने न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.

न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी यांच्यासमक्ष या प्रकरणाची सुनावणी झाली. याचिकेनुसार, मुलगा व सून दोघेही पती पत्नी शिक्षक आहे. दोघांचा पाच वर्षांपूर्वी लग्न झाले. मात्र, मुलाला दारूचे व्यसन असल्यामुळे व इतर कौटुंबिक कारणांमुळे सून गेल्या तीन वर्षांपासून वेगळी राहत होती. १४ सप्टेंबरला सून आणि मुलगा यांची पुयारदंड (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) बसस्थानकावर भेट झाली. त्यात जवाहरनगर (जि. भंडारा) येथील व्यसनमुक्ती केंद्राचे काही कर्मचारी उपस्थित होते.

त्यांनी व सुनेने याचिकाकर्त्या आईच्या मुलाला जबरदस्तीने कारमध्ये ओढले आणि तेथून पळ काढला. हा सर्व प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येईना. त्यामुळे त्यांनी थेट जवाहरनगर (जि. भंडारा) पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी १९ सप्टेंबरला ही बाब याचिकाकर्त्या आईच्या निदर्शनास आणून दिली. प्राथमिक पोलिस चौकशी दरम्यान या व्यसनी मुलाला पत्नीने व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्याचे उघड झाले. सून आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील वाद व व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याबाबतची सर्व माहिती पोलिसांनी दिली.

त्यामुळे, आईला व्यसनमुक्ती केंद्राशी संपर्क साधण्याचा सल्ला त्यांनी दिला. मुलाच्या भेटीसाठी आईने २० सप्टेंबरला आपल्या मोठ्या मुलासह व्यसनमुक्ती केंद्र गाठले. मात्र, केंद्र चालकांनी व्यसनी मुलाचा ताबा देण्यास नकार दिला. त्या विरोधात आईने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली व मुलाचा ताबा देण्याबाबत विनंती केली. सुनेतर्फे ॲड. नीलेश फुलझेले यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT