nagpur news  sakal
नागपूर

Nagpur News : गर्भनिरोधक साधने कुचकामी ठरल्याने हजारांवर गर्भपात!

एमटीपीच्या अहवालात धक्कादायक खुलासा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - गर्भनिरोधक साधने कुचकामी ठरल्याने विविध धोकादायक साधनांचा वापर करून शहरात हजारांवर मुली व महिलांनी गर्भपात केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

नागपूर महापालिकेच्या एमटीपी युनिटने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी महिन्याला एक हजार विवाहित महिला तर दिवसाला एका अविवाहित मुलीने गर्भपात केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकूनच स्त्रियांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे

अनेकवेळा विविध समस्यांमुळे स्त्रीवर गर्भपात करण्याची वेळ येते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे गरजेचे आहे. पण असे न करता सर्रासपणे जीवघेणे उपाय करून गर्भपात करण्याचे प्रमाण वाढल्याचे, या आकडेवारीवरून दिसून येते. मागील वर्षी १२ हजार ७४५ महिलांनी गर्भपात केला.

यात गर्भनिरोधक साधने कुचकामी ठरल्याने ९ हजार ३१४ महिलांना गर्भपात करावा लागला आहे. म्हणजेच ७३ टक्के महिलांनी गर्भनिरोधक साधनांचा उपयोग केल्याचे समजते. ज्याचा विपरित परिणाम महिलांवर झाल्याची शक्यता आहे.

गर्भपातासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. कायद्यानुसार गर्भधारणेपासून २४ आठवड्यांपर्यंत अविवाहित महिला गर्भपात करू शकतात. तर विवाहित महिला ह्या वेगवेगळ्या कारणांनुसार स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गर्भपात करून घेऊ शकतात.

मात्र अनेक जण अज्ञान व भीतीपोटी घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे बऱ्याचदा संबंधित स्त्रीला अतिरक्तस्राव होऊन जीवितास धोका वाढतो. एमटीपीच्या आकडेवारीनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षातील आकडेवारीनुसार अविवाहित मुलींचे गर्भपाताचे प्रमाण १८ टक्के असल्याचे समोर आले आहे. वर्षभरात ४८३ म्हणजेच दिवसाला सरासरी एका मुलीचा गर्भपात झाला आहे.

केव्हा करता येतो गर्भपात

गर्भवतीच्या जिवाला धोका असेल

मानसिक, शारीरिक आरोग्याला धोका असल्यास

जन्माला येणाऱ्या बाळात व्यंग असल्यास

महिलेला बलात्कारातून गर्भधारणा झालल्यास

विवाहित किंवा लिव्ह इनमध्ये असलेल्या महिलेच्या बाबतीत संततीनियमनाची साधने कुचकामी ठरल्यास

गर्भनिरोधकांचे दुष्परिणाम

अनियमित रक्तस्राव

अनियमित पाळी

मळमळ, उलट्या

स्तनांना सूज येणे

शरीर सुजणे

वजन वाढणे

स्वभावात तीव्र चढउतार होणे

गोळ्यांमुळे लैंगिक संक्रमित आजारांपासून संरक्षण होत नाही.

गर्भपात करणाऱ्या संस्था (२०२२-२३)

शासकीय रुग्णालय ६८२

खासगी रुग्णालय १२,०६३

एकूण गर्भपात १२,७४५

करण्यात आलेले गर्भपात

अविवाहित मुलींचे ४८३

विवाहित महिलांचे १२,२६२

या कारणाने झाले गर्भपात

बलात्कारानंतरचे गर्भपात ५३

गर्भनिरोधक साधने कुचकामी होणे ९,३१४

बाळाची वाढ योग्य न होणे ४६३

मातेचे मानसिक आरोग्य बिघडणे ३६९

मातेच्या जिवास धोका ५०५

मातेचे आरोग्य धोक्यात १,७२८

कारण निश्चित नसणे ३१३

एकूण १२७४५

अलीकडे जाहिराती बघून आय-पील गोळ्या घेण्याचे प्रकार वाढले आहेत. एखादवेळी त्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका आहे. रक्तस्राव झाल्यास त्यावर नियंत्रणासाठी आणखी गोळ्या घ्याव्या लागतात. हे धोकादायक आहे. गर्भनिरोधक गोळ्यांची एक सायकल असते. त्यात मुलींकडून चूक झाल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

- डॉ. संगीता खंडाईत, प्रसूतीरोग तज्ज्ञ,

इंदिरा गांधी रुग्णालय, मनपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारचा 'आनंदाचा शिधा' बंद शक्यता, कारण काय?

PMC News : बांधकाम परवानगीचे अधिकार द्या; समाविष्ट गावांबाबत पुणे महापालिकेचे राज्य सरकारला पत्र

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

SCROLL FOR NEXT