fraud  sakal
नागपूर

Nagpur News :मामाचा मुलगाच निघाला ठकबाज ; २कोटी ४१ लाख रुपयांनी फसवणूक

ही घटना जरीपटका येथील हेमू कॉलनीत उघडकीस आली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - आत्याची तब्येत ठिक राहत नसल्याने देखरेखीसाठी बोलाविलेल्या मामाच्या मुलानेच आर्थिक हेरफेर करीत, २ कोटी ४१ लाख रुपयांनी फसवणूक केली. ही घटना जरीपटका येथील हेमू कॉलनीत उघडकीस आली. पोलिसांनी अनिता अशोक मोरयानी (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तन्मय नरेश दुधानी (वय ३१, रा. भोपाल) असे आरोपीचे नाव आहे. जरीपटका येथील हेमु कॉलनीमध्ये राहणाऱ्या अनिता अशोक मोरयानी यांच्या आईची प्रकृती २०१९ मध्ये खराब असताना त्यांनी आपल्या मामेभाऊ असलेल्या तन्मयला भोपाल येथून बोलावून घेतले. यावेळी त्याच्यावर विश्‍वास असल्याने तो त्यांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार बघू लागला.

यादरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू झाल्याने त्यांनी सर्व आर्थिक व्यवहार त्याच्याकडे दिले. त्याने या विश्‍वासाचा फायदा घेत, अनिता यांच्या वडिलांनी जमा केलेली संपूर्ण रक्कम स्वतःचा नावाने ॲक्सिस बॅकेत खाते उघडून जमा केली. तसेच त्याने अनिता व त्याची आई व बहिणीचे वडीलोपार्जीत दागिने स्वतःच्या लॉकरमध्ये ठेवले.

याशिवाय ते परतही दिले नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या बॅकेतील एफ.डी वर लोन घेवून अनिता यांच्या खोटी सह्या करून तेही पैसे लाटले. याशिवाय दागिणे व रोख असा एकूण २ कोटी ४१ लाख २१ हजार रूपयाचा मुद्देमाल स्वतःच्या नावाने करून घेतला. याप्रकरणी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिस उपनिरीक्षक काळे यांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT