Nagpur NMC 
नागपूर

कचऱ्यातून महापालिकेला मिळणार तब्बल ५ कोटी; ई-कचरा येणार कामी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ई-कचरा (e-waste) सध्या सर्वत्र समस्या ठरत आहे. नागरिकांच्या घरी वर्षानुवर्षे हा कचरा तसाच पडलेला आहे. ही बाब लक्षात घेत नागपूर शहरातील ई-कचऱ्याचे (electronic waste in Nagpur) योग्यरित्या संकलन आणि व्यवस्थापन केल्यास नागपूर महानगरपालिकेला (Nagpur NMC) महसूल प्राप्त होऊ शकेल, अशी अभिनव संकल्पना शहराचे महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी मांडली आहे. (Nagpur NMC get 5 crore from electronic waste)

नागपूर शहराचा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चौफेर विकास होत आहे. त्यादृष्टीने ओला, सुका कचरा व्यवस्थापनाप्रमाणेच ई-कचऱ्याकडेही लक्ष देणे ही अत्यंत आवश्यक आहे. आजघडीला संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक ई-कचरा निर्माण होणाऱ्या दहा शहरांमध्ये नागपूर शहराचा समावेश आहे.

e waste

शहरात कचरा व्यवस्थापनासाठी दोन स्वतंत्र कंपन्या नियुक्त करून सुसूत्रता आणण्यात आली आहे. मात्र ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था शहरामध्ये नाही. त्यादृष्टीने ही महत्त्वपूर्ण संकल्पना महापौरांनी मांडली आहे. त्या अनुषंगाने स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी याचा समावेश मनपाच्या अर्थसंकल्पामध्ये केला आहे.

e waste

मनपाच्या माध्यमातून वेंडर निर्धारित करून करून ई-कचऱ्याची त्याला विक्री करण्यात आली व त्या वेंडरला शासकीय धोरणानुसार व नियमानुसार ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम देण्यात आल्यास शहरातील ई-कचरा संपुष्टात येईल. याशिवाय या कचऱ्यातून नागपूर महानगरपालिकेला वर्षाला ४ ते ५ कोटींचे उत्पन्न होणे अपेक्षित आहे. मनपाच्या माध्यमातून ई-कचऱ्याची विल्हेवाट लावून पर्यावरण संरक्षणासोबतच नवीन मार्गातून उत्पन्नाचे साधन उभे करता येतील, असेही तिवारी यांनी नमूद केले आहे.

(Nagpur NMC get 5 crore from electronic waste)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT