Nagpur number of theft increase CCTV closed sakal
नागपूर

नागपुरातील बहुतांश CCTV हे बंद

पीडब्ल्यूडी-स्मार्ट सिटीत पैशाच्या वाद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत घरफोड्या, दुचाकी वाहनासह चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, त्यांना अटक करण्यासाठी मदत होणारे बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने गुन्हेगारांना कसे जेरबंद करणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एल ॲण्ड टी कंपनीच्या माध्यमातून शहरात जवळपास ३ हजार ७०० वर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे सुरू आहे.

या कामांमध्ये विविध ठिकाणी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. या प्रकाराने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या केबलला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जरीपटका, कपिलनगर आणि मानकापूर सारख्या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खोदकामाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या केबलला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानाची भरपाई म्हणून नागपूर स्‍मार्ट ॲण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडद्वारे (स्मार्टसिटी) मागण्यात येत आहे.

ही नुकसान भरपाई ७५ लाखांवर असल्याचे कळते. मात्र, अद्याप ती भरपाईची रक्कम मिळाली नसल्यानेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड यांना विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

केवळ स्मार्ट पोलिसिंगवरच भर

गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांचा स्मार्ट पोलिसींगवर भर असल्याचे दिसून येत आहे. तपासात सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजचा वापर वाढला आहे. त्यामुळे ह्यूमन इंटेलिजन्सचे प्रमाण कमी झाल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. त्यातून घटनांमध्येही वाढ होत असल्याचे बोलल्या जात आहे.

गुन्हेगारांवर वचक कसा बसणार?

अशावेळी पोलिसांना या चोरट्यांना अटक करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत होते. मात्र, शहरातील जरिपटका, मानकापूर, कपिलनगर आणि इतर भागातील निम्मे सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक कसा बसणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

चोरट्यांचाही हाच मार्ग

शहरात होणाऱ्या चोऱ्या आणि घरफोड्यांतील आरोपी चोरी करीत, मध्यप्रदेश आणि तेथून उत्तरभारत, बिहार आणि पश्‍चिम बंगालकडे पळतात. त्यासाठी याच मार्गांचा वापर होताना दिसून येतो. त्यामुळे याच मार्गावरील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॅमेरे बंद असल्याने चोरांचेही चांगलेच फावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT