Nagpur Offline MCQ in all universities exam announcement Uday Samant sakal
नागपूर

नागपूर : सर्वच विद्यापीठात ‘ऑफलाइन एमसीक्यू’

उदय सामंत यांचे सुतोवाच; नागपूर, गडचिरोली विद्यापीठाची परीक्षा जाहीर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये ‘ऑफलाइन एमसीक्यू’ (बहुपर्यायी प्रश्‍न) परीक्षेचा पॅटर्ननुसार परीक्षा घेण्यात येणार आहे. या पॅटर्नला विरोध होत असताना, आता अशाच पॅटर्ननुसार तेराही अकृषी विद्यापीठांमध्ये परीक्षा घेण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे परीक्षेच्या गुणवत्तेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेला आहे.

राज्यातील सर्वच विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात असा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत झाला. त्यामुळे ही परीक्षा ऑफलाइन (वर्णनात्मक) होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २५ दिवसांनी नागपूर विद्यापीठाने परीक्षेच्या तारखा आणि पद्धतीची घोषणा केली. यामध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याचे ठरले. मात्र, त्यात बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिका देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञांनी टीका केली. त्यानंतर मंगळवारी गोंडवाना विद्यापीठानेही याच पद्धतीनुसार परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यावर आज सकाळी दीक्षान्त कार्यक्रमानंतर उदय सामंत यांना प्रश्‍न विचारला असता, ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे. याशिवाय ती कशी घ्यावी हाही निर्णय सर्वस्वी कुलगुरूंवर असल्याने त्यावर काही बोलता येणार नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता सर्वच विद्यापीठांना अशाच प्रकारे परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याने राज्यातील सर्वच विद्यापीठ ‘ऑफलाइन एमसीक्यू’ पॅटर्ननुसार परीक्षा घेतील असे दिसून येत आहे.

अनेकांनी ऑनलाइनसाठी निवेदन दिले. मात्र, कोरोना संपला असल्याने आता केवळ ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. आता विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ऑफलाइनचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी कोणत्या पद्धतीने ती परीक्षा पार पाडावी ही त्यांची जबाबदारी आहे, त्यात ढवळाढवळ करणार नाही.

-उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT