Pench Tiger Reserve Tigress Death: पेंच व्याघ्र प्रकल्पातील पूर्व पेंच वन परिक्षेत्रातील सिल्लारी जवळील गाभा क्षेत्रात पर्यटकांसमोर वाघिणीचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण उघड झालेले नाही. तिला पोटाचा आजार अथवा आंतरिक रोगामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या पाच दिवसांतील तिसरा मृत्यू आहे. राज्यात तीन महिन्यांतील ११ वाघांचा मृत्यू झाला आहे.
पेंच प्रकल्पातील सिल्लारी बाजूला पूर्व पेंच रेंजच्या कुटुंबा बिटमध्ये कंपार्टमेंट क्रमांक ५३१ मध्ये ही घटना घडली. वाघांच्या मृत्यूची अलीकडील घटना नैसर्गिक अधिवासात होत असल्याने ही धोक्यांची घंटा मानले जात आहे. वाघिणीचा मृत्यू सोमवारी (ता.१) दुपारच्या सफारी दरम्यान घडली. पर्यटक भिवसेन कुटीजवळील कुटुंबा बिटमध्ये पर्यटन करीत होते. दरम्यान, पंप हाऊस परिसराजवळ वाघीण दिसली.
त्रासदायक लक्षणे असलेली ही वाघीण पाणी पित होती. पर्यटकांनी वाघीण असामान्य श्वासोच्छ्वास घेत असल्याचे जाणवले. त्यानंतर तिने उलट्या केल्या आणि लगेच निपचित पडली. मार्गदर्शक आणि जिप्सी चालकांनी तातडीने वनरक्षक आणि वनपालांना माहिती दिली. सर्वच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर वाघिणीचा मृतदेह जाळण्यात आला. संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र, कोणतेही पुरावे मिळाले नाही. वाघिणीचे सर्व बाह्य अवयव सुस्थितीत होते. तसेच कोणतीही इजा झाल्याचे दिसले नाही.(Latest Marathi News )
विहिरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू
कळमेश्वर वन परिक्षेत्रातील आदासा उपवनक्षेत्र मोहपा, क्षेत्रामधील सावंगी व्यव्हारे येथील शेतातील विहिरीत बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. ही विहीर चंद्रकांत पांडुरंग श्रीखंड यांची आहे. सकाळी मजूर शेतात गेल्यानंतर त्यांना तो विहिरीत पडल्याचे श्रीखंडे यांना दिसून आले. त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने माहिती दिली.
वनकर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. बछड्याला काढण्यासाठी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी विहिरीतील पाणी बाहेर काढले. तेव्हा बिबट मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. मृत बछड्याचे वय एक ते दीड वर्षाचे आहे. त्याचे सर्वच अवयव सुस्थितीत आहेत. त्याला काढताना रात्र झाल्याने शवविच्छेदन करण्यात आले नाही. उद्या शवविच्छेदन करण्यात येणार आहे. (Latest Marathi News )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.