पोलीस चेकिंग
पोलीस चेकिंग  Pix_Pratik
नागपूर

नागपूर पोलिस इन ॲक्शन मोड: रस्त्यावर हुंदडणाऱ्यांची चौकशी; दिवसभरात ६४० वाहने जप्त

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यानंतरही नागपूरकर मोठ्यासंख्येने घराबाहेर पडत असल्याचे चित्र उपराजधानीत दिसून येत आहे. यामुळे ठिकठिकाणी नाकाबंदी करून घराबाहेर पडलेल्यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. शुक्रवारी एकाच दिवशी विनाकारण फिरणाऱ्यांकडील ६४० वाहने ताब्यात घेण्यात आली. याशिवाय कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८९० जणांवर कारवाई करण्यात आली.

राज्यात गुरुवारपासून १५ दिवसांचा मिनी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. कठोर निर्बंधांनंतरही शहरातील बाजारपेठांमध्ये नागपूरकर गर्दी करीत आहेत. विविध रस्त्यांवरही वाहनांची नियमित वर्दळ दिसून येते. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत निर्बंध अधिक कडक करण्याची सूचना केली आहे.

त्यानुसार शुक्रवारपासून पोलिस दलानेही कठोर भूमिका घेतली आहे. आज शहराच्या विविध भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवली. पोलिसांची गस्त वाढण्यासोबतच अनेक प्रमुख भागांमध्ये नाकाबंदी लावलेली दिसून आली. वाहनचालकांना थांबवून घराबाहेर पडण्याबाबत विचारणा करण्यात आली. आवश्यक कामासाठी जाणाऱ्यांना पुढे जाण्याची मुभा देण्यात आली. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

आज दिवसभरात शहराच्या विविध भागातून ६४० वाहने ताब्यात घेण्यात आली. मास्क न लावणाऱ्या २८८ जणांवर कारवाई करीत २२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६०२ हुल्लडबाजांकडून २२ हजार ९०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.

ठिकठिकाणी बॅरिगेट

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी लॉकडाउन दरम्यान शहरात ६६ ठिकाणी नाकाबंदी राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार संवेदनशील व महत्त्वाचे चौक व ठिकाणी पोलिसांनी छावणी उभारल्या आहेत. त्या लगतच बॅरिगेट लावून वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे. जुना काटोल नाका चौकात चारही बाजूने बॅरिगेट्स लावून वाहनचालकांना थांबविण्यात आले. चौकशी करीत योग्य कारण देणाऱ्यांनाच सोडण्यात आले. सक्करदरा चौक, हसनबागसह बर्डीकडे येणाऱ्या मार्गांवर पोलिस कारवाई करताना दिसून आले. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT