Nagpur POP idol shops seal sakal
नागपूर

नागपूर : पीओपी मूर्ती विक्री दुकानांना सील करणार

श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून दिवाळीपर्यंत कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पीओपी मूर्तीची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा बडगा मनपा प्रशासनाने उगारला आहे. ही कारवाई श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून दिवाळीपर्यंत सुरू राहणार आहे. न्यायालयीन आदेश व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार एक जानेवारी २०२१ पासून पीओपी मूर्ती निर्मिती व विक्रीवर बंदी आहे. त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर पीओपी मूर्ती बाजारात विक्रीला येत असल्याची तक्रार आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता मागील वर्षीच्या माहितीच्या आधारावर गणेशोत्सवाच्या आधीच पीओपी मूर्ती निर्माते व विक्रेत्यांची दुकाने व गोडाऊनला सील ठोकण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शिष्टमंडळाला दिले.

पारंपरिक मूर्तिकार संघाचे अध्यक्ष सुरेश पाठक यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने गुरुवारी मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. श्रीकृष्ण जन्माष्टमी ते दिवाळीपर्यंत कारवाई सतत सुरू राहील, असेही आयुक्तांनी सांगितले. शहराचे बाहेरून येणाऱ्या पीओपी मूर्तीवर दंडात्मक व जप्तीची कारवाई करण्यात येईल. म्हणून मूर्तीकारांनी पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तीची निर्मिती करावी व ग्राहकांनी मातीच्याच मूर्तीच घ्याव्या, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले.

या मागण्यांवर कारवाईची मागणी

शहराच्या बाहेरून आयात होणाऱ्या पीओपी मूर्तीवर बंदी लावावी, मूर्ती विक्रीसाठी परवान्याची तिथी एक महिना आधी घोषित करावी, पीओपी मूर्ती विक्री दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत सील करण्यात यावी, पारंपरिक मातीची मूर्ती निर्मिती व विक्री करणाऱ्या मूर्तीकाराना परवाना शुल्क माफ करावे, त्यांना मूर्ती विक्रीसाठी मनपाच्या प्रत्येक झोनमध्ये निःशुल्क जगा उपलब्ध करून द्यावी, पीओपी मूर्ती बंदीच्या अभियानात मदत व सहकार्य करणाऱ्या मूर्ती तज्ज्ञाला अधिकृत प्रमाणपत्र द्यावे, स्वच्छता अभियानाच्या जाहिरातीप्रमाणे शहरातील भिंतींवर पेंटींग जाहिरात करून जनजागृती करावी आदी मागण्या करण्यात आल्या. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या सर्व मागण्यांवर सविस्तर सकारात्मक चर्चा करून सहकार्य व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT