Prithviraj Chavan Congratulations to Ranjit Deshmukh  sakal
नागपूर

क्षमता असूनही देशमुखांना न्याय मिळाला नाही; पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण; ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्यावर कौतुक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्यात मुख्यमंत्री ‘मटेरियल’ होते. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता होती. सरकार असो की पक्ष, प्रत्येक जबाबदारी पार पाडताना त्यांनी चमक दाखवली. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना जो न्याय मिळायला हवा होता, तो मिळाला नाही, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केली. (Prithviraj Chavan News)

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी कृषीमंत्री रणजित देशमुख यांचा आज अमृत महोत्सव समारंभ रेशिमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, तृणमूल कॉंग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती रणजित देशमुख, रुपा देशमुख, शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने, कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव आशिष दुवा, माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार, माजीमंत्री वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, विनोद गुडधे पाटील, माजी आमदार एस. क्यू. जमा, अमर काळे, दिलीप सानंदा, अविनाश वारजूरकर, अजहर हुसेन, राजेंद्र मुळक यांच्यासह रणजित देशमुख यांचे जुने सहकारी उपस्थित होते.

उपस्थितांमध्ये माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, डॉ. अमोल देशमुख ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्या चाहत्यांसह बसले होते. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानपत्र व पुष्पहार घालून रणजित देशमुख यांचा गौरव करण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रणजित देशमुख एक आदर्श राजकीय नेतृत्त्व असल्याचे नमुद केले. ते पुढे म्हणाले, रणजित देशमुख यांनी कृषीमंत्री म्हणून उल्लेखनीय योगदान दिले. दोन वेळा प्रदेश युवक कॉंग्रेस व दोन वेळा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. वेळप्रसंगी त्यांनी पक्षाशी भांडण करीत विदर्भाची भूमिका मांडली. ते आक्रमक होते. त्यांच्यात महाराष्ट्राचे नेतृत्त्व करण्याची क्षमता होती. परंतु, काही कारणाने त्यांना संधी मिळाली नाही.

विदर्भच नव्हे तर महाराष्ट्राचा दौरा करून त्यांनी पक्ष बांधणी केली. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्‍ट्रात पक्षाचे ४० खासदार निवडून आले होते, असे त्यांनी सांगितले. यावेळी महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा जणू मेळावाच असल्याचे सांगितले. यावेळी रणजित देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अनावरण करण्यात आले. रणजित देशमुख यांनी यावेळी राजकीय प्रवास उलगडला अन् आलेल्या प्रत्येकाचे आभार मानले. प्रास्ताविक राजेंद्र शर्मा यांनी तर संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT