Promise Day
Promise Day Sakal
नागपूर

Promise Day : आजचा दिवस खऱ्या प्रॉमिसचाच! युवकांचा कल सरप्राईज, लाँग ड्राइव्हवर जाण्याचा

सकाळ वृत्तसेवा

‘व्हॅलेंटाइन वीक’मधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘प्रॉमिस डे’. अर्थातच आणाभाका घेण्याचा दिवस.

नागपूर - ‘व्हॅलेंटाइन वीक’मधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘प्रॉमिस डे’. अर्थातच आणाभाका घेण्याचा दिवस. आयुष्यभर एकमेकांसाठी काहीतरी करण्यासाठी वचन देण्याचा, आयुष्यभर एकमेकांचा सांभाळ करण्याची ग्वाही देण्याचा हा दिवस. महागड्या गिफ्ट ऐवजी प्रेमाची खात्री देणे हीच सर्वात मोठी भेट असते. त्यामुळे प्रत्येक प्रेमी युगलांसाठी प्रॉमिस डे महत्त्वाचा असतो. उपराजधानीतील तरुणांनी सुद्धा हा दिवस काही हटके अंदाजात साजरा करण्याचा बेत आखला आहे.

नागपूरकरांना कल आपल्या पार्टनरला सरप्राईज्ड गिफ्ट किंवा पार्टी देण्याकडे आहे. तर काही जण आवडते स्ट्रीट फूड खाण्याच्या तयारीत आहेत. शनिवार असल्यामुळे अनेक जण लॉग ड्राईव्हवर जाऊन हा दिवस साजरा करण्याची प्लॅनिंग करत असून अनेकांचा प्लॅन पिकनिक टूरला जाण्याचा आहे.

असा साजरा करा ‘प्रॉमिस डे’

  • नाते बळकट करण्यासाठी हाताने तयार केलेल्या भेट कार्डावर आवश्यक वचन लिहून काढा. ते कार्ड सरप्राईज म्हणून आपल्या प्रिय व्यक्तीला द्या.

  • लिहिणे आवडत असेल तर आपल्या सुंदर अक्षरात प्रेमाच्या वचनाचे पत्र लिहून ते पार्टनरला द्या.

  • कस्टमाईज्ड गिफ्ट देऊनही प्रॉमिस,-डेचा आनंद द्विगुणित करता येऊ शकतो.

  • प्रॉमिस-डे रिंग ही दिलेल्या वचनांची आठवण म्हणून भेट देता येईल.

प्रेमात ‘प्रॉमिस डे’चे महत्त्व

  • ‘प्रॉमिस डे’ प्रेमाची नाते जपणाऱ्या प्रत्येकाला, भुतकाळात त्यांनी दिलेल्या वाचनावर विचार करण्याची संधी देते. सोबतच नवी वचने देण्याचा आणि तो पाळण्याचा हा दिवस असतो.

  • केवळ शब्द आणि हावभाव व्यक्त करूनच प्रेम चालत नाही. तर, चांगल्या आणि वाईट काळात एकमेकांसाठी उभे राहणे सुद्धा महत्त्वाचे असते. त्यासाठी एकमेकांना प्रोत्साहित करावे म्हणून हा दिवस महत्त्वाचा असतो.

  • ‘प्रॉमिस डे’ हा नातेसंबंधातील शक्तीचा उत्सव आहे. प्रेमी जोडप्यांसोबतच मित्र असो किंवा कुटुंबातील सदस्य, आपली अतूट वचन बद्धता प्रकट करण्याचे प्रतीक म्हणून हा दिवस पाळला जातो.

  • ‘प्रॉमिस डे’ एखाद्या व्यक्तीला सहजपणे पूर्ण करू शकतील अशी वचने देऊन त्यांचे खरे प्रेम व्यक्त करण्यात मदत करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

Video: PM मोदींना जिरेटोप घातल्याने वाद पेटला! संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार गट आक्रमक

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT