नागपूर : मृत्यूच्या काही वेळेआधी कथासंग्रहाचे प्रकाशन sakal
नागपूर

नागपूर : मृत्यूच्या काही वेळेआधी कथासंग्रहाचे प्रकाशन

मधुकर कुकडे यांनी पत्नीची अंतिम इच्छा केली पूर्ण; आयसीयूमध्ये प्रकाशन सोहळा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : साहित्यिक त्याच्या कलाकृतीबाबत किती संवेदनशील असतो आणि प्रत्येक कलाकृतीवर किती जिवापाड प्रेम करतो याची प्रचिती दंदे हॉस्पिटलमध्ये आली. ज्येष्ठ साहित्यिक सुभाषिनी कुकडे यांनी ‘मॉम यु आर ग्रेट’ या कलाकृतीची निर्मिती केली. परंतु, प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ‘आयसीयू’त असताना त्यांनी पती मधुकर यांच्याकडे कथासंग्रह प्रकाशनाची इच्छा व्यक्त केली होती. इहलोकाच्या वाटेवर असलेल्या आपल्या अर्धांगिनीची इच्छा पूर्ण करीत मधुकर कुकडे यांनी ‘आयसीयू’ मध्येच प्रकाशन सोहळा आयोजित केला. कथासंग्रहाच्या प्रकाशनानंतर काहीच तासात सुभाषिनी यांनी समाधानाने जगाचा निरोप घेतला.

कोरोना झाल्याने ‘मॉम यु आर ग्रेट’चा प्रकाशन सोहळा दोनवेळा पुढे ढकलावा लागला होता. गेल्यावर्षीच त्यांना आजाराने गाठले. फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्याने त्यांच्यावर गेल्या सव्वा महिन्यापासून शहरातील दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आजाराच्या काळात सुभाषिनी यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत पती मधुकर कुकडे यांच्याकडे बऱ्याचदा बोलल्या होत्या. आठ दिवसांपूर्वी प्रकृती अचानक खालावल्याने मधुकर कुकडेसुद्धा कासावीस झाले.

मृत्यूच्या काही वेळेआधी कथासंग्रहाचे प्रकाशन

प्रकृती गंभीर असताना रुग्णालयात प्रकाशन कसे करावे, असा मोठा प्रश्न उभा ठाकला. मधुकर यांच्या जिवाची घालमेल डॉ. पिनाक दंदे यांनी हेरली. ‘आयसीयू’ मध्येच कथासंग्रहाचे प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला. मधुकर कुकडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर पाहुण्यांना या सोहळ्याला पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यांनीसुद्धा मोठ्या मनाने होकार दर्शविला आणि ‘आयसीयू’मध्येच हा छोटेखानी पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी, काँग्रेसचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्तेसुद्धा या भावनिक क्षणामुळे भारावले होते. सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, बाबूराव तिडके, डॉ. दंडे फाउंडेशनचे पिनाक दंदे यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सुभाषिनी कुकडे यांची ही इच्छा पूर्ण होताच मध्यरात्री अडीच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, त्यांचे आणखीन एक पुस्तक छपाईच्या प्रक्रियेमध्ये असून त्याचेसुद्धा लवकरच प्रकाशन करण्याचा मानस मधुकर कुकडे यांनी व्यक्त केला आहे. सुभाषिनी कुकडे यांचे आजवर सहा पुस्तक प्रकाशित झाले आहेत.

"पुस्तक प्रकाशित होऊ शकले नसल्याने तिचा जीव कासावीस होत होता. बरेवाईट होण्यापूर्वी पुस्तक प्रकाशित व्हावे, अशी तिची इच्छा होती. पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि मन तृप्त झाले. सुभाषिनीला अजूनही बरेच काही लिहायचे होते."

-मधुकर कुकडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात ढगाळ वातावरण कायम, 'या' जिल्ह्यांत पावसाचा इशारा, तुमच्या भागांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Karad Accident: ट्रकखाली चिरडून कऱ्हाडला महिला ठार; दुचाकीला ट्रकची पाठीमागून धडक, अंगावरुन गेलं ट्रकचे चाक!

‘ऑपरेशन सह्याद्री चेकमेट’मध्ये ५५ कोटींचे ड्रग्ज जप्त; सहा अटकेत, डीआरआयकडून पाचुपतेवाडीतील कारखाना उद्‌ध्वस्त!

आजचे राशिभविष्य - 28 जानेवारी 2026

सोलापूर जिल्ह्यातील वास्तव! २०२५ मध्ये ३४२ अल्पवयीन मुलींचे अपहरण अन्‌ १८५४ महिला-तरुणी बेपत्ता; ४० अल्पवयीन मुली अन्‌ २८५ महिला सापडल्याच नाहीत

SCROLL FOR NEXT