Police constable Suicide
Police constable Suicide esakal
नागपूर

नागपूर : दोनपानी पत्र लिहून पोलिस जमादाराची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

पुसद : बिटरगाव पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस जमादाराने राहत्या घरी लुंगीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता पुसद येथील लक्ष्मीनगरात घडली. आत्महत्येपूर्वी दोन पानांचे पत्र लिहून घटनेला पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

विष्णू सखाराम कोरडे (वय ५४, रा. पुसद) असे मृत पोलिस जमादाराचे नाव आहे. विष्णू कोरडे हे आजारपणामुळे सुटीवर होते. त्यांनी दोन पानांच्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले. कोरडे हे यवतमाळ पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. ते महागाव येथे कार्यरत असताना लाचलुचपत प्रकरणात निलंबित झाल्याने त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान त्यांची बदली यवतमाळ पोलिस मुख्यालयात करण्यात आली. चौकशीनंतर बिटरगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. दरम्यान, कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात होऊन मणक्यास जबर मार लागला. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्याने त्यांनी पुसद येथे बदली करण्याची व वैद्यकीय देयके मंजूर करण्याची विनंती पोलिस अधीक्षकांकडे केली होती.

मात्र, पोलिस अधीक्षकांनी बदली केली नाही व वैद्यकीय देयकांवर स्वाक्षरीही केली नाही, असा आरोप कोरडे यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत केला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर विष्णू कोरडे यांच्यावर हिंदू स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश शुक्ला, पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, आई, दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे. पुसद शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

गुन्हेगार महत्त्वाचे आहेत काय?

गुन्हेगार महत्त्वाचे आहेत काय? पोलिस नाही काय?, असा प्रश्न जमादार विष्णू कोरडे यांनी आपल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत विचारला आहे. आपल्या आत्महत्येस जिल्हा पोलिस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप मृत्यूपूर्व चिठ्ठीत केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

सीबीआय चौकशीची चिठ्ठीत केली मागणी

आपल्या मृत्यूस पोलिस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करीत विष्णू कोरडे यांनी शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेतला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली तरच आपल्याला न्याय मिळेल, असेही त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

पुसद येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही एक पोलिस कर्मचारी गमावला याचे दुःख आहे. या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बदली, वेतन या बाबी अभिलेखावरील आहेत. चौकशीदरम्यान सत्य समोर येईल. एसीबी ट्रॅप, निलंबन, अपघात, बदली या बाबी माझ्या काळातील नाहीत. पोलिस कर्मचारी कधीही प्रत्यक्ष पत्नीसह मला भेटले नाही. रजेवर असताना वेतन थांबविण्यात आले नाही. धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांचे वेतन सुरू ठेवले. पत्रात त्याबद्दल का लिहिण्यात आले मला माहीत नाही. चौकशीनंतर सत्य समोर येईल.

-डॉ. दिलीप पाटील भुजबळ पोलिस अधीक्षक, यवतमाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : एक सच्चा देशभक्त संसदेत पोहोचणार आहे- आशिष शेलार

SCROLL FOR NEXT