Nagpur Railway station sakal
नागपूर

Nagpur Railway station : कुत्रे आणि प्रवासी एकाच प्रतीक्षालयात

काळोखात विश्रांती ; रेल्वे स्थानकावर अस्वच्छता, पंख्यांचीही व्यवस्था नाही

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्यवर्ती रेल्वे स्थानकाला वर्ल्ड क्लास करणार असले तरी तुर्तास, स्थानकाची स्थिती अतिशय बिकट आहे. लाइट बंद, दिवसा अंधाराची स्थिती, पंख्यांची सुविधा नाही. या अस्वच्छतेत प्रवासी विश्रांती घेत असून त्याच्य बाजूला कुत्रे झोपलेले दिसतात. हे चित्र आहे, रेल्वे स्थानकाच्या संत्रा मार्केट प्रवेशद्वाराकडील प्रतीक्षालयाचे.

मध्यवर्ती रेल्वे स्थानकाची वास्तू तशी हेरिटेज. समोरून आकर्षक आणि सुविधायुक्त दिसणारे स्थानक मागच्या पूर्व प्रवेशद्वारकडून तेवढेच दुर्लक्षित आहे. तिकीट आरक्षण काउंटरला लागूनच प्रवाशांना बसण्याकरिता जागा आहे. प्रवासी येथे गाड्यांची वाट पाहत विश्रांती करतात. गाड्यांना विलंब असल्यास ओट्यावरच झोपतात. मात्र, या ठिकाणचे लाइट बंद आहेत. भर दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथे अंधार असतो. प्रवाशांची हालचाल सुद्धा दिसत नाही. त्याचा फायदा काही संशयित घेऊ शकतात.

प्रवाशांना बसण्यासाठी येथे आसन तयार केले आहे. याच ठिकाणी प्रवासी गाड्यांची वाट पाहात विलंब असल्यास झोपतात सुद्धा. अस्वच्छतेत प्रवासी विश्रांती करतात. इतकेच नाही तर त्यांच्याच बाजूला कुत्रे सुद्धा विश्रांती घेतात. वर्ल्ड क्लास होणाऱ्या या स्थानकावर कुत्रे येतातच कसे? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. लाईटच्या देखभाल दुरुस्तीचा अभाव आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी असलेले हे स्थानक अधिकाऱ्यांच्या सुविधायुक्त असलेले दिसत आहे. स्थानकावर प्रवासीच नसतील तर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपयोग काय ? त्यामुळे स्थानकावर प्रवाशांना आधी सुविधा मिळायला हवी. मात्र, संत्रा मार्केटचा पूर्व प्रवेशद्वाराकडील भाग दुर्लक्षित असल्याचे दिसत आहे.

स्थानकाचा मागील भागही वर्दळीचा

देशातील प्रमुख स्थानकापैकी एक नागपूरचे मध्यवर्ती रेल्वे स्थानक मानले जाते. देशाच्या मध्यभागी असलेल्या या स्थानकावरून रोज ३८ हजारांवर प्रवाशांचे ये-जा आहे. दरदिवशी १८० रेल्वेगाड्या येथून जातात. तर महिन्याला २८० गाड्यांची संख्या आहे. फलाट क्रमांक ८ सह इतर फलाटावर जाण्या आणि येण्याकरिता प्रवासी मोठ्या संख्येने या भागाचा उपयोग करतात. फलाट क्रमांक ८ वर बहुतांश गाड्यांची रेलचेल असते. तिकीट आरक्षण केंद्र आणि प्रवासी विश्रांतीची सुविधा आहे. मात्र, येथे विश्रांतीची सुविधा केवळ नावालाच असून काळोखाच्या सावटात, अस्वच्छतेत आणि कुत्र्यांच्या सहवासात प्रवाशांना राहावे लागत असल्याचे वास्तव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT