Nagpur Ramtek laborer died in accident Lakhapur Incident  sakal
नागपूर

नागपूर : अपघातात 'मजुराचा' मृत्यू

रामटेक तालुक्यातील लाखापूर येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

रामटेक : तालुक्यातील लाखापूर शिवारात ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडल्याने सुरेंद्र नंदू मरकाम (४१) याचा मुत्यू झाला. २९ एप्रिलला रात्री ९ वाजता लोधा येथील ईश्वर दसाराम फुलबेल (३७) व जितेंद्र दसाराम फुलबेल (२६) यांनी ट्रॅक्टर, ट्रॉलीसह रस्त्यावर ठेवले होते. दरम्यान बोलेरो वाहनचा चालक प्रशांत कोकोडे ( रा. झिंझेरिया,ता. रामटेक ) याने ट्रॅक्टरला धडक दिली.

यावेळी ट्रॅक्टरवरील मजूर सुरेंद्र मरकाम खाली पडला. त्याचवेळी ट्रालीचे डाव्या बाजूचे चाक त्याच्या मानेवरून गेल्याने चाकाखाली दबून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून बोलेरोचा चालक प्रशांत कोकोडे व जितेंद्र फुलबेल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal Snapchat Chat Viral : सिया गोयल प्रकरणात नवा ट्विस्ट; मैत्रिणीसोबतचे स्नॅपचॅट चॅट व्हायरल, 'लग्न होणार नाही तरीही तिकीट काढते', तपासाला नवे वळण?

Mumbai Dam Storage: मुंबईकरांचा पाणी कपातीचा प्रश्न मिटणार? धरण क्षेत्रात मोठा पाऊस, पाणी साठा किती वाढला?

Latest Marathi Live Update: कोंढव्यात रस्ते खोदकामामुळे भीषण वाहतूक कोंडी

बारावीत असताना झालेलं पहिलं लग्न; १७ वर्षांनी घेतला काडीमोड, का मोडलेला नागराज मंजुळेंचा संसार?

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

SCROLL FOR NEXT