Registration for degree admission from 27th June
Registration for degree admission from 27th June sakal
नागपूर

नागपूर : पदवी प्रवेशासाठी २७ जूनपासून नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्न असणाऱ्या विविध महाविद्यालयातील अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेची घोषणा केली. त्यानुसार विद्यार्थ्यांना २७ जूनपासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.

दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाद्वारे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश देण्यात येत होते. मात्र, त्या प्रक्रियेला विरोध झाल्याने विद्यापीठाद्वारे थेट महाविद्यालयातून प्रवेशासाठी प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. बारावीच्या निकालाची घोषणा बुधवारी करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी विद्यापीठाद्वारे पदवी प्रवेशासाठी वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत विद्यापीठाच्या https://rtmnuoa.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक असणार आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही.

तत्पूर्वी महाविद्यालयाद्वारे उद्यापासून प्रवेश अर्जाची विक्री करता येणार आहे. ३ जुलै ही अर्ज सादर करण्याची शेवटली तारीख असून ६ जुलैला महाविद्यालयांद्वारे गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ ते १५ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी भरपूर वेळ मिळणार असल्याचे विद्यापीठाच्या महाविद्यालय विभागाचे उपकुलसचिव डॉ. रमन मदने यांनी सांगितले.

असे आहे पदवी प्रवेशाचे वेळापत्रक

प्रवेशासाठी संकेतस्थळ :

https://rtmnuoa.digitaluniversity.ac

  • विद्यापीठाकडे नोंदणी : २७ जूनपर्यंत

  • महाविद्यालयात अर्ज भरणे : ९ जून ते ३ जुलैपर्यंत

  • गुणवत्ता व प्रतिक्षा यादी : ७ जुलै

  • महाविद्यालयात प्रवेश : ७ ते ११ जुलै

  • प्रतिक्षा यादीतील प्रवेश : १३ ते १५ जुलै

  • या कागदपत्रांची पडणार आवश्‍यकता - गुणपत्रिका, टीसी व इतर दस्तावेज व प्रमाणपत्र

प्रवेशाचा कट ऑफ वाढणार

यावर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८४ हजाराहून अधिक आहे. मागील काही वर्षांत पारंपारिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. यामुळे पारंपारिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. पारंपारिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांत यंदा शुल्कासोबतच कटऑफही वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT