नागपूर

Nagpur: खासगी रुग्णालयात बिलावरुन वाद अन् नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये गोंधळ

धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचाराच्या बिलावरून नातेवाईक व डॉक्टरांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. वेळीच पोलिसांनी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर प्रकरण शांत झाले.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Dhantoli Chaos in Private Hospital: धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचाराच्या बिलावरून नातेवाईक व डॉक्टरांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. वेळीच पोलिसांनी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर प्रकरण शांत झाले.
याबाबत असे की, उपचारासाठी धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात एक रुग्ण दाखल झाला. उपचारातून बरा झाल्यानंतर नातेवाइकांच्या हाती बिल देण्यात आले.

बिलामध्ये जादा शुल्क आकारण्यावरून रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये शाब्दीक चकमक झाली. यानंतर मात्र बिल भरण्यास नातेवाइकांनी नकार देत डॉक्टरला धमकी देत होते. नातेवाईक गोंधळ करीत असल्याची वार्ता धंतोली पोलिसांना कळविण्यात आली. तत्काळ पोलिसांचा ताफा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नातेवाईकांकडून बिलाची रक्कम अदा करण्यात आली नाही. यामुळे रुग्णाला सुटी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. पैसे भरण्यास नातेवाइकांनी नकार दिल्याचे सांगण्यात आले. यावरून वादाला तोंड फुटले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मात्र प्रकरण शांत झाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! 'या' लाडक्या बहिणींवर होणार कारवाई, मंत्री आदिती तटकरेंचा थेट इशारा..

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Shirur Police Crackdown: शिरूर पोलिसांची गावठी व बेकायदा दारूविक्रीवर धडक कारवाई; हातभट्ट्या उध्वस्त

Latest Marathi News Live Update : काँग्रेस नक्षलवाद्यांना हुतात्मे संबोधते आणि त्यांच्यासाठी अश्रू ढाळते - भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला

नवरा वकील, सासू माजी न्यायाधीश ! तरीही केला हुंडयासाठी छळ; त्विशा शर्माने मैत्रिणीला केलेला मेसेज चर्चेत

SCROLL FOR NEXT