nagapur
nagapur sakal
नागपूर

नागपूर : ग्रामविकास विभागाने मोडला प्रोटोकॉल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. त्यात राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला प्रचार-प्रसिद्धीसाठी बॅनर पाठविले आहे. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनंतर इतर मंत्र्यांचे नाव व फोटो असणे आवश्यक आहे. परंतु या बॅनरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने प्रोटोकॉल मोडल्याची चर्चा आहे. त्याच प्रमाणे या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याने आश्चर्च व्यक्त करण्यात येत आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याने देशभरात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान केंद्र शासनाकडून राबविल्या जात आहे. मात्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने पाठविलेल्या बॅनरवरून चांगलीच चर्चा रंगली आहे. आधीच विरोधकांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुपर पॉवर मुख्यमंत्री असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ नाममात्र आहे, अशी टीका होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत असलेल्या बॅनरवर ग्रामविकास विभागाचे नाव स्पष्ट असून ‘१३ ते १५ ऑगस्ट हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकविताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरविण्याची आवश्यकता नाही. ध्वजसंहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वज आपल्या सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे. राष्ट्रीय ध्वज हे राष्ट्राचे एक प्रतिरूप असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने त्याचा सन्मान करणे गरजेचे आहे’, असा संदेश दिला आहे.

त्याच्या खालच्या बाजुला उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख असून फोटो नाही. त्यांच्या नावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोसह उल्लेख आहे. हे बॅनर जिल्हा परिषदेने लावले नसून शासनाकडून आले असल्याचे अध्यक्ष रश्मी बर्वे, सदस्य प्रकाश खापरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT