Nagpur Samruddhi Highway  Esakal
नागपूर

Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर मोठा अपघात, उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक; चालकाचा जागीच मृत्यू

धामणगाव तालुक्यातील तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १२४ जवळ उभ्या ट्रक पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने यामध्ये पश्चिम बंगाल राज्यातील ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

Samruddhi Expressway Accident: धामणगाव तालुक्यातील तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १२४ जवळ उभ्या ट्रक पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने यामध्ये पश्चिम बंगाल राज्यातील ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

कंटेनर ट्रक क्रमांक एन. एल. ०१ ए.ए. ४१९० ने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. त्यामुळे अपघात झाला. ट्रक क्रमांक यूपी ७२ एटी ३३०२ चा चालक मो. इब्राहिम मो. इलियास प्रतापगड उत्तर प्रदेश व क्लीनर मो अमीर मो-सलीम खान प्रतापगड उत्तरप्रदेश हे ट्रकचा टायर रोडच्या साईडला ट्रक उभे करून बदलत होते. त्याचवेळी उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली त्यामुळे अपघात झाला.

यात चालक सुभाश चंद्रबोद बोदरा रा. पाला हावडा पश्चिम बंगाल हा ट्रकमध्ये अडकला होता. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी सदर ट्रक चालकाला बाहेर काढून त्याला रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे पाठविले. तसेच दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे पाठविले. पोलिसांनी अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT