guru Padmambhushan Sri M sakal
नागपूर

Nagpur : आध्यात्मिक गुरू श्री एम यांच्या सत्संग प्रवचनाची सुवर्णसंधी

१७ डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू आणि समाजसुधारक पद्मभूषण श्री एम यांच्यासोबत परम सत्संगाचा सुवर्णयोग लाभणार आहे. १७ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे सत्संग सोहळ्याची अनोखी अनुभूती घेता येईल. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आणि सत्संग फाउंडेशनच्या सहयोगाने हे आयोजन करण्यात आले आहे.

श्री एम यांची योगगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही जगभर ख्याती आहे. आध्यात्मिक गुरू होण्याचा त्यांचा प्रवास अद्‍भूत आहे.केरळमध्ये एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना गुरूदर्शन झाले. त्यानंतर आध्यात्मिक ओढीने वयाच्या १९ व्या वर्षी ते एकटेच हिमालयात निघून गेले. बद्रीनाथजवळील एका प्राचीन गुहेत त्यांना त्याच गुरूंचे दर्शन झाले. असे म्हणतात की, त्यांच्यासोबत यापूर्वी झालेल्या पहिल्या भेटीचे स्मरणही त्यांना येथे झाले. त्यांच्या सान्निध्यात श्री एम यांनी कठोर ध्यानधारणा आणि तपश्चर्या केली. तीन वर्षांच्या काळानंतर त्यांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झाली. यादरम्यान आणि पुढे त्यांनी अनेक संत-महंतांसोबत भेटी घेत ज्ञानपूर्तता केली. तिबेटमध्येही ते फिरून आले.

आध्यात्मिक गुरू श्री एम यांच्या सत्संग प्रवचनाची सुवर्णसंधी

गुरूंच्या आदेशानंतर त्यांनी आपले जीवन लोकोन्नतीसाठी मिशन म्हणून व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षे त्यांनी रामकृष्ण मिशन आणि कृष्णमूर्ती फाउंडेशनमध्ये व्यतीत केले. पुढे त्यांनी प्रवचन देणे सुरू केले. त्यांचे तेजपुंज व्यक्तिमत्त्व, अमोघ अमृत वाणी आणि दीपवून टाकणारे ज्ञान यामुळे अल्पावधीत त्यांचे जगभर अनुयायी आणि विशाल शिष्यशृंखला निर्माण झाली. सामाजिक सद्‍भाव, एकता, सौहार्द या मूल्यांची शिकवण ते देतात.

यासाठी त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्राही पूर्ण केली. त्यांच्या प्रवचनामुळे मानवी हृदयात सकारात्मक परिवर्तन होते. जीवनाकडे बघण्याची सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असा जगभरातील रसिकांचा अनुभव आहे. नागपूरकर श्रोत्यांना त्यांच्या सत्संग प्रवचनाची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सकाळ माध्यम समूह आणि सत्संग फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT