crime news
crime news sakal
नागपूर

नागपूर : संपत्तीच्या वादातून वडिलांचा खून

सकाळ वृत्तसेवा

सिल्लेवाडा : संपत्तीचा वाद विकोपाला गेल्याने जन्मदात्याला मोठ्या आई-वडिलांच्या मदतीने अल्पवयीन मुलाने बेदम मारहाण केली. त्यात वडिलांचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जगमोहन बनवारीलाल शाक्य (वय-५०) रा. सिल्लेवाडा असे मृताचे नाव असून पोलिसांनी शनिवारी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सिल्लेवाडा वेकोलि वसाहतीमधील जगमोहन बनवरीलाल शाक्य (वय-५०) हे कुटुंबासोबत राहतात. त्यांना अपंग मुलगी आणि १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. त्यांच्या शेजारी त्यांचा मोठा भाऊ ब्रिजमोहन बनवरीला शाक्य (वय-५४) राहतो. ब्रिजमोहन यांना मूलबाळ नसल्याने आपल्या लहान भावाच्या मुलाला लहानपणापासून आपल्याकडे ठेवून त्याचा सांभाळ केला. गेल्या काही दिवसांपासून जगमोहन आणि ब्रिजमोहन या दोघा भावांत संपत्तीचा वाद सुरू होता. यातून अनेकदा त्यांच्यामध्ये भांडण झाले.

कधी-कधी प्रकरण हमरीतुमरीवरही आले. मंगळवार, २८ जून रोजी जगमोहन याने ब्रिजमोहन याला काही कामासाठी शिडी मागितली. यावरून त्यांच्यात भांडण झाले. ते विकोपाला गेले व भांडणात ब्रिजमोहनसोबत, त्याची पत्नी आणि जगमोहन यांचा मुलगा सहभागी झाले. शाब्दिक भांडण हातघाईवर आले. तिघांनीही जगमोहन याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात जगमोहनला गंभीर इजा झाली आणि तो बेशुद्ध झाला. जखमी अवस्थेत मृताच्या पत्नीने शेजाऱ्याच्या मदतीने जवळच्या चिचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.

मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे जगमोहन यांना मेयोत दाखल करण्यात आले. त्यांच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू होते. शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मेयो पोलिस चौकीतील पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लागलीच खापरखेडा पोलिसांना कळवले. सिल्लेवाडा येथे आरोपींच्या घरी पोलिस आले, तेव्हा घराला कुलूप होते. शेवटी तिन्ही आरोपींना अण्णामोड येथून अटक करण्यात आली. आरोपी ब्रिजमोहन शाक्य, त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलावर विविध कलामअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT