nagpur sakal
नागपूर

Nagpur : एसटीच्या ताफ्यात स्लीपर बस दाखल

चारपैकी दोन गाड्या पोहोचल्या ‘सकाळ’चे वृत्त ठरले खरे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - एसटी महामंडळ नागपूर विभागाच्या ताफ्यात स्लीपर बस (साधी शयनयान) दाखल झाली असून गणेशपेठ आगारात दोन गाड्या शुक्रवारी पोहोचल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना नागपूर-पुणे प्रवास आता झोपून करता येणार आहे.

खासगी ट्रॅव्हल्सची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी एसटीने कंबर कसली आहे. दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत बसची बांधणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ५० गाड्या तयार करण्यात येतील. त्यापैकी ४ गाड्या नागपूर विभागाला मिळणार असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने १९ ऑगस्ट रोजी ‘महामंडळाच्या ताफ्यात येणार स्लीपर बस’ या मथळ्याखाली प्रकाशित केले होते.

त्यात नागपूर विभागाला ४ गाड्या मिळणार असल्याचे नमूद केले होते. अखेर शुक्रवारी दोन गाड्या नागपूरच्या गणेशपेठ आगारात दाखल झाल्या. गाड्या पोहोचल्याची खात्री आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी दिली. पुणे येथून उर्वरित दोन गाड्या पोहोचणार आहे.यामुळे खासगी ट्रॅव्हल्सकडून वारेमाप भाडे आकारण्यात येत असल्याने प्रवाशांची लुट काही प्रमाणात थांबेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शनिवार, ७ ऑक्टोबरपासून गाड्या पुण्यासाठी मार्गस्थ होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्लीपर कोचचे भाडे प्रवाशांना परवडणारे माफक राहणार आहे. या बसमुळे प्रवाशांचा आरामदायक प्रवास होईल. एक चांगली सेवा यामाध्यमातून नागपूरच्या प्रवाशांना उपलब्ध झाली आहे.

श्रीकांत गभने, उपमहाव्यवस्थापक- नागपूर व अमरावती प्रादेशिक विभाग (एसटी महामंडळ)

शिवशाहीच्या तुलनेत कमी भाडे

३० आसने असलेल्या बसमध्ये प्रवासाच्या दृष्टिकोनातून सर्वच सुविधा देण्यात आल्या आहेत. शिवशाहीचे नागपूर-पुणे सोळाशे रुपये भाडे आहे. त्यातुलनेत स्लीपर बसचे भाडे कमी राहणार आहे.

खासगीचे प्रवासी एसटीकडे वळतील

नागपुरातून पुणे, हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर, इंदौर, शेगाव, आदिलाबाद, अंबेजोगाई आदी लांब पल्ल्याच्या गाड्या चालतात. नागपूर-पुणे ही सर्वात व्यस्त चालणारी गाडी आहे. या मार्गावर शिवशाहीच चालविली जाते. नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वेळेवर रेल्वेचे तिकीट आरक्षित होत नसल्याने प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळतात. खासगीच्या तुलनेत एसटीचे तिकीट स्वस्त असल्यास प्रवासी आता एसटीकडे वळतील असा विश्वास महामंडळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT