Nitin Gadkari Sakal
नागपूर

निवडणुकीत दारू पाजण्याचा धंदा बंद करा; नितीन गडकरींचा नगरसेवकांना सल्ला

राजेश प्रायकर -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : येत्या काही महिन्यांत महापालिका निवडणूक येत आहे. काही लोक दारूची प्रतीक्षाच करीत असते. कुणीही दारूची अपेक्षा ठेऊ नका. निवडणुकीत दारू पाजण्याचा धंदा बंद करा, असा सल्ला केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवकांना दिला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी वंदे मातरम् जन आरोग्य केंद्र सुरू करण्यात येत आहे. आज भिवसेनखोरी बौद्ध विहार येथील पहिल्या केंद्राचे लोकार्पण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते.

व्यासपीठावर स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, नगरसेवक संदीप जाधव, नगरसेविका माया इवनाते, नगरसेवक सुनील अग्रवाल, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेवक अमर बागडे, नगरसेविका रूतिका मसराम, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, नगरसेविका वर्षा ठाकरे आदी उपस्थित होते. महापौर बदलला की काम बंद असे आरोग्य केंद्राचे होऊ नये, नाहीतर आपण बदनाम होऊ, असा इशारा देत गडकरी यांंनी आरोग्य केंद्र बंद पडल्यास माझ्याकडे या, आपण पुन्हा सुरू करू, अशी ग्वाहीही दिली.

यावेळी त्यांनी भिवसेनखोरी या परिसराची जुनी आठवण काढली. येथील तरुणांना खेळ, रोजगारात लक्ष देण्याचे आवाहन केले. शिक्षणासोबत आरोग्य सेवा महत्त्वाची आहे. याशिवाय मैदानेही आवश्यक असून खेळातून उत्तम व्यक्तिमत्त्व तयार होईल. रोजगारासाठीही प्रयत्न केले जात असून संगणकाचा अभ्यासक्रम तसेच इंजिनिअरिंग केलेल्या तरुणांनी माझ्याकडे बायोडाटा पाठवावा.

२०२४ पर्यंत शहर व विदर्भातील १ लाख तरुणांना रोजगार देण्याचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. याशिवाय ६० वर्षांवरील नागरिकांना चष्मा, कर्णयंत्र, काठी या वस्तू मोफत देण्यात येत आहे. ज्यांना पाय नसेल, त्यांना पाय लावून दिला जात आहे. अशा नागरिकांची यादीही संदीप जाधव, माया इवनाते यांच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.

सर्वच रस्त्यांची दुरावस्था

भिवसेनखोरी परिसरातील रस्ते दुरुस्तीसाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा गडकरी यांनी केली. यावेळी त्यांनी सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याचा उपरोधिक टोलाही मनपाला हाणला. २५ लाखांत रस्ते दुरुस्त न झाल्यास आणखी ५० लाख देईल, असेही गडकरी यांंनी या परिसरातील नगरसेवकांना आश्वस्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT